How To Avoid Bitter Cucumber Saam Tv
लाईफस्टाईल

Avoid Buying Bitter Cucumber: काकडी खाताना कडू लागते ? विकत घेताना या चुका करु नका

How To Buy Cucumber : बऱ्याचदा आपण बाजारातून विकत आणलेली काकडी खाताना कडू निघते.

कोमल दामुद्रे

Tips To Choose Cucumbers : बऱ्याचदा आपण बाजारातून विकत आणलेली काकडी खाताना कडू निघते. अशा वेळी नेमकी कोणती काकडी विकत घ्यावी हा प्रश्न पडतो. त्यामुळे काकडी विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत निरोगी राहाणे आणि शरीराचा उष्माघातापासून बचाव करणे आवश्यक असते. त्याकरीता या ऋतूत मिळणारी फळे जी 80 ते 90 टक्के पाण्याने (Water) भरलेली असतात यांचे सेवन आपल्या दैनंदिन आहारात करणे फायद्याचे ठरते. याच फळांमधील एक फळ म्हणजे 'काकडी' ज्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवली जाऊ शकते.

तसे पाहायला गेले तर काकडी फार महाग विकली जात नाही. परंतु ती विकत घेताना एक समस्या येते ती म्हणजे कधी कधी काकडी (Cucumber) कडू निघते. ज्यामुळे आपल्याला काकडी खाताना त्याची चव कडू लागते. असे एक-दोनदा झाल्यास आपण अनेकदा काकडी विकत घेण्यापूर्वी विचार करतो आणि काही वेळा विकत घेणे टाळतो. परंतु आता तुम्हाला काकडी विकत घेण्यापूर्वी विचार करण्याची गरज नाही. फक्त या टिप्स लक्षात ठेवल्यास काकडी कडू निघणार नाही. चला जाणून घेऊयात या खास टिप्सः

1. काकडीच्या सालीवरुन ओळखावी काकडीची चव

काकडी विकत घेताना काकडीची साल नीट तपासून घेणे गरजेचे असते. जर साल गडद हिरव्या रंगाची असून त्यावर हलका पिवळसरपणा असेल तर काकडी ताजी आणि खाण्या योग्य आहे असे समजावे. या काकडीत कडूपणा नसतो.

2. काकडी नरम आहे की नाही

काकडी विकत घेताना काकडीला हाताने दाबून पाहावे. जर काकडी हाताला नरम लागत असेल तर आतमध्ये बिया जास्त असू शकतात. चांगली काकडी नेहमी टणक असते तेव्हा काकडी विकत घेताना ही गोष्ट लक्षात ठेवावी.

3. काकडीचा आकार

बाजारात अनेक आकाराच्या काकड्या उपलब्ध असतात. त्यामुळे काकडी विकत घेताना नेहमी लहान आकाराच्या काकड्या निवडाव्यात. त्याच बरोबर काकडी अधिक जाड किंवा बारीक नसावी या गोष्टीची काळजी (Care) घ्यावी.

4. कोणती काकडी घेणे टाळावे

कापलेली काकडी विकत घेण्यापासून टाळावी. त्याच बरोबर ज्या काकडीवर पांढऱ्या रेषा असतील अशा काकड्या विकत घेणे टाळावे अशा काकड्या चवीला अधिक कडू असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT