Cucumber Soup Recipe : उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी ट्राय करा स्पेशल दही-काकडी सूप, पाहा रेसिपी

Healthy Soup : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून आराम मिळवण्यासाठी दही आणि काकडी स्पेशल थंडगार सूप ट्राय करा. त्यामुळे अनेक फायदेही होतील.
Cucumber Soup Recipe
Cucumber Soup RecipeSaam Tv

Summer Season Special Soup : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून आराम मिळवण्यासाठी आपण कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात पितो. परंतु कधी कधी या कोल्ड्रिंक्सचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही दही आणि काकडी स्पेशल थंडगार सूप ट्राय करा. त्यामुळे अनेक फायदेही होतील.

अनेकदा आपण हिवाळ्यात सूप पिण्याला अधिक महत्त्व देतो. मात्र असे काही सूप आहेत ज्याचा वापर उन्हाळ्यात हलका आहार म्हणून तुम्ही करू शकता. या सूपमध्ये उकडलेले चणे वापरले जातात. त्यामुळे हे प्रोटीनयुक्त सूप वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह (Diabetes) ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर आहे.

Cucumber Soup Recipe
Soya Idli Recipe : मधुमेहांसाठी फायदेशीर ठरेल सोया इडली, पाहा रेसिपी

1. दही-काकडी स्पेशल सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • किसलेली काकडी

 • चणे

 • दही

 • काळी मिरी

 • हिरवी मिरची

 • लसूण (Garlic)

 • हिरवी कोथिंबीर

 • मीठ

 • ऑलिव्ह ऑईल (oil)

Cucumber Soup Recipe
Alu Vadi Recipe : बिहारी स्टाईलमध्ये बनवा अळू वडी, पाहा रेसिपी

2. कृती

 • दही-काकडी झटपट सूप बनवण्यासाठी चणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्यातील पाणी (Water) काढून टाका.

 • प्रेशरकुकरमध्ये चणे घालून 3-4 शिट्ट्या होईपर्यंत राहून द्या.

 • आता काकडी घेऊन साल काढून लहान तुकडे करा.

 • त्यानंतर ब्लेंडर घेऊन त्यात हिरवी मिरची, किसलेली काकडी, चणे, दही, काळीमिरी मीठ आणि हिरवी कोथिंबीर घाला.

 • आता हे मिश्रण घट्ट क्रीमी होईपर्यंत मिक्स करत रहा.

 • त्यानंतर एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात लसूण चांगले तळून घ्या आणि त्यात सूप घालून चांगले मिक्स करून घ्या.

 • तुमच्या आवडीनुसार गार्निश करा आणि या सुपचा आनंद घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com