Alu Vadi Recipe : बिहारी स्टाईलमध्ये बनवा अळू वडी, पाहा रेसिपी

Recipe : अनेक लोकांना अळूच्या पानांची वडी खायला आवडते.
Alu Vadi Recipe
Alu Vadi RecipeSaam Tv

How To Make Alu Vadi: देशात अनेक भागांमध्ये अळूच्या पानांची भाजी खाल्ली जाते. ही चविष्ट भाजी आरोग्यासाठीही फायदेशीर असते.अनेक लोकांना अळूच्या पानांची वडी खायला आवडते.

अळूच्या पानांची वडी बनवण्यासाठी पाने बेसनाच्या पिठात गुंडाळले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला बिहारी स्टाईलमध्ये अळूच्या पानांची वडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ही अतिशय चविष्ट भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला या भाजीची चव विसरता येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी बद्दल.

Alu Vadi Recipe
Rajma Masala Recipe : डिनरला स्पेशल रेसिपी ट्राय करायची आहे ? असा बनवा राजमा मसाला !

1. साहित्य

 • अळूची पाने – 8/10

 • बेसन – 1 कप

 • जिरे – ½ टीस्पून

 • हळद (Turmeric) – ½ टीस्पून

 • ओवा – ¼ टीस्पून

 • धने पावडर – 1 टीस्पून

 • लाल तिखट – 1 टीस्पून

 • कोथिंबीर – 2/3 चमचे

 • हिरवी मिरची-आले पेस्ट – 1 टीस्पून

 • अमचूर – ½ टीस्पून

 • गरम मसाला - ½ टीस्पून

 • तेल (Oil) – आवश्यकतेनुसार

 • मीठ – चवीनुसार

Alu Vadi Recipe
Masala Kanda Roti Recipe : नाश्त्याला सतत तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? मसाला कांदा रोटी नक्की ट्राय करा

2. कृती

 • अळूच्या पानांची रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम पानांचे देठ तोडून वेगळे करा. त्यानंतर पाने पाण्याने (Water) स्वच्छ घुवून घ्या.

 • आता एका मिक्सिंग बाउलमध्ये सर्व मसाले मिक्स करून घ्या. मिश्रणात चवीनुसार मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालून बेसनाचे जाड द्रावण तयार करा.

 • लक्षात ठेवा द्रावण पातळ राहू नये. त्यानंतर एक प्लेट स्पॉट पृष्ठभागावर उलटवा. आता त्या प्लेटवर अळूचे पान ठेवा आणि त्यावर बेसनचे तयार मिश्रण पसरवा.

 • नंतर त्यावर आणखी एक अळूचे पान ठेवून पुन्हा बेसनाच्या पिठाचा थर लावा. अशाप्रमाणे चार-पाच पाने एकावर एक ठेवून बेसनचे थर लावा.

 • यानंतर, प्रथम दोन्ही बाजूंनी पाने आतील बाजूने दुमडून घ्या आणि नंतर त्यांचा रोल तयार करा.

 • रोल तीन-चार ठिकाणी जाड धाग्याने चांगले बांधून घ्या म्हणजे रोल उघडणार नाहीत.

 • आता एक भांडे घ्या आणि त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.

 • भांड्यावर एक गाळणी ठेवा आणि त्यावर सर्व तयार रोल ठेवून गाळणी वरून झाकून ठेवा.

 • त्यामुळे रोल पाण्याच्या वाफेने व्यवस्थित शिजू शकतील. त्यांना कमीत कमी 20 मिनिटे शिजवा.

 • तुम्हाला हवे असल्यास, वाफेऐवजी, तुम्ही पाने थेट पाण्यातही शिजवू शकता. लक्षात ठेवा की अळूची पाने कच्ची राहू नयेत.

 • आता पाने मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि चाकूच्या साह्याने रोलचे लहान तुकडे करून घ्या. आता एका कढईत तेल टाकून तेल गरम करा.

 • नंतर तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेले तुकडे टाकून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगाचे होऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर गॅस बंद करा. ही डिश चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com