Rajma Masala Recipe : डिनरला स्पेशल रेसिपी ट्राय करायची आहे ? असा बनवा राजमा मसाला !

Food : तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा तुमच्याकडे एखादा खास दिवस असेल तर, तुम्ही राजमा मसाला ही रेसिपी बनवू शकता.
Rajma Masala Recipe
Rajma Masala RecipeSaam Tv
Published On

Dinner Time Recipe : अनेक व्यक्तींना लंच आणि डिनरमध्ये राजमा चावल ट्राय करण्यास आवडते. ज्या व्यक्तींना पंजाबी जेवण जास्त प्रमाणात आवडते त्या व्यक्ती तर राजमाच्यावल भरपूर प्रमाणात खातात. पंजाबी फुडमध्ये राजमा चावलला भरपूर पसंत केले जाते. तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा तुमच्याकडे एखादा खास दिवस असेल तर, तुम्ही राजमा मसाला ही रेसिपी बनवू शकता.

राजमा मसाला चवीला अतिशय उत्कृष्ट असतो. सोबतच राजमा मसाला तुम्ही भाताबरोबर किंवा रोटी बरोबर खाऊ शकता. एखाद्या पार्टी (Party) फंक्शनमध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्ही अनेकदा राजमा मसाला चाखला असेल. पण तुम्हाला हॉटेल (Hotel) सारखाच राजमा मसाला जर घरी बनवायचं असेल तर, आम्ही सांगितलेल्या विधीप्रमाणे ही रेसिपी बनवून पहा.

Rajma Masala Recipe
Rava Roll Recipe : यंदाच्या वीकेंडला बनवा रव्यापासून टेस्टी रोल, पाहा रेसिपी

1. राजमा मसाला बनवण्याची सामग्री :

  • राजमा एक कप

  • एक कांदा

  • दोन कप टोमॅटो (Tomato) प्युरी

  • अद्रक लसूण पेस्ट एक टेबलस्पून

  • दोन टेबलस्पून हिरवी कोथिंबीर

  • लाल तिखट एक टेबलस्पून

  • जिर एक टेबलस्पून

  • हळद एक टीस्पून

  • जिरेपूड एक टीस्पून

  • धणेपूड एक टीस्पून

  • गरम मसाला एक टीस्पून

  • आमचूर एक टीस्पून

  • गरम मसाला अर्धा टीस्पून

  • कसुरी मेथी एक टीस्पून

  • शुद्ध तूप एक टेबलस्पून

  • चार ते पाच लवंग

  • दालचिनीचा एक तुकडा

  • एक तेजपत्ता

  • एक काळी वेलची

  • मीठ चवीनुसार

Rajma Masala Recipe
Cookies Recipe For Diabetic Patient : मधुमेहींनो, सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? मग नाचणीचे कुकीज नक्की ट्राय करा

2. कृती

  • चविष्ट राजमा बनवण्यासाठी सर्वात आधी राजमा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा.

  • सकाळी उठल्यावर कुकरमध्ये भिजवलेला राजमा घालून वेलची, तेजपत्ता, आणि मीठ टाकून 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्या.

  • त्यानंतर गॅस बंद करून कुकरला थंड होऊ द्या.

  • आता एका कढईमध्ये शुद्ध तूप टाकून मिडीयम फ्लेमवर गरम करा.

  • त्यानंतर तुपामध्ये दालचिनी, लवंग आणि जिरे टाकून परतून घ्या.

  • जिर चांगल तडकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाका.

  • त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि चिरलेली मिरची टाकून परता.

  • जेव्हा कांद्याचा रंग लालसर होईल तेव्हा त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाका.

  • त्यानंतर दहा ते बारा मिनिटे मिश्रण चांगल शिजू द्या. जेव्हा ग्रेव्ही तूप सोडेल तेव्हा गॅस कमी करा.

  • त्यानंतर ग्रेव्हीमध्ये लाल तिखट, धणेपूड, हळद, गरम मसाला आणि आमचूर पावडर टाकून मिक्स करा. त्यानंतर कुकरचे झाकण उघडून राजमा कढईमध्ये टाका.

  • राजमा आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता कढईवर झाकण ठेवून राजमा पंधरा मिनिटे शिजवा.

  • राजमा मसालामध्ये कसुरी मेथी आणि चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com