How To Make Rava Roll : विकेंडच्या दिवशी प्रत्येकाला असे वाटते की काहीतरी वेगळा आणि टेस्टी नाश्ता हवा. अशातच नाश्ता स्पेशल आणि हेल्दी असायला हवा. कारण सकाळचा नाश्ता ठरवतो की, तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा असेल की नाही.
त्याचबरोबर कधीही नाश्ता स्कीप करू नये. सारखी एकच डिश खाऊन लोक कंटाळले आहेत. त्यामुळे ब्रेकफास्टसाठी काहीतरी मजेशीर बनवायला हवे असे वाटत असते.
बरेच लोकं वीकेंडला बेसनाचा पोळा, डोसा, इडली, पोहा अशा प्रकारच्या डिश बनवतात. तुम्ही आतापर्यंत रव्यापासून बनलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. परंतू तुम्ही रव्याचा रोल कधी ऐकला आहे का ? नसेल तर आज आम्ही तुम्हाला रव्याचा रोल कसा बनवावा याची रेसिपी सांगणार आहोत.
1. रव्याचा रोल बनविण्यासाठीची सामग्री :
रवा : 1 कप
मैदा : 2 मोठे चमचे
आलं : एक तुकडा
दही : एक कप
पाणी : अर्धा कप
मिठ : चवीनुसार
चिली फ्लेक्स : एक मोठा चमचा
2 ते 3 बारीक कापलेल्या मिरच्या
कढीपत्ता 5 ते 6
बारीक चिरलेली कोथिंबीर.
2. कृती :
एका मिक्सरमध्ये एक कप मैदा आणि एक कप रवा टाकून मिक्स करून घ्या.
आता यामध्ये आलं (Ginger), पाणी (Water), मीठ आणि दही टाकून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
ग्राइंड केल्यानंतर जेव्हा याची एक पेस्ट तयार होईल तेव्हा एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्या.
आता यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स, बारीक कापलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून पुन्हा पिसून घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी टाकून उकळी काढून घ्या.
उकळी आल्यानंतर पॅनमध्ये एक स्टॅन्ड ठेवा. त्यानंतर एक प्लेट घेऊन तिला तेल (Oil) लावून घ्या.
तेल लावून झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये रव्याचे बॅटर ओतून स्टीम कुक होण्यासाठी तीन ते पाच मिनिटे झाकून ठेवा.
त्यानंतर चाकूच्या सहाय्याने तीन ते सहा भाग कापून घ्या. आणि एकेकाचा रोल बनवून घ्या. तयार आहे रव्याच्या रोलची रेसिपी.
हे रोल तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.