Pudina Chutney Recipe : पोटाची जळजळ थांबवण्यासाठी पुदिन्याची चटणी ठरेल फायदेशीर, पाहा रेसीपी

Pudina help us Acidity Problem : बदलत्या ऋतूमुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पुदिना चटणीचे सेवन करू शकता.
Pudina Chutney Recipe
Pudina Chutney RecipeSaam Tv

Acidity Problem : पुदिना हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. अशातच अनेक व्यक्ती पुदिन्याची चटणी बनवुन तिचे सेवन करतात. थंडीचा नंतर आता वातावरणात गरमीचे दिवस सुरू होत आहेत अस दिसत आहे.

बदलत्या ऋतूमुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पुदिना चटणीचे सेवन करू शकता. पुदिण्यामध्ये अँटी इन्फामेट्री आणि अँटिबॅक्टरियल गुण उपलब्ध असतात जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Pudina Chutney Recipe
Chikoo Peels Recipe : चिकूच्या सालीपासून बनवा चविष्ट असे पदार्थ !

भारतीय व्यंजनांमध्ये चटनी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते आणि ऋतूप्रमाणे चटणीला आहारात शामील केले जाते. सोबतच चटण्यांमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात.

बदलत्या ऋतुमुळे अनेक व्यक्तींना रात्रीच्या वेळी पोटामध्ये जळजळ होणे आणि ऍसिडिटी होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. अशा वेळी तुम्ही पुदिन्याच्या चटणीचे सेवन करू शकता. पुदिन्याची चटणी चवीसोबत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री :

  • पुदिन्याची पाने - 2 कप

  • कांदा (Onion) - 3 कप

  • हिरवी कोथिंबीर - 1 कप

  • साखर (Sugar) एक टेबलस्पून

  • लिंबू रस एक टेबलस्पून

  • जाडी हिरवी मिरची एक टेबलस्पून

  • मीठ चवीनुसार

Pudina Chutney Recipe
Apple Halwa Recipe : मिनिटांत बनवा चविष्ट असा सफरचंदाचा हलवा !

पद्धत :

  • पुदिना चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  • आता कांदा घेऊन त्याला बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्या. एका वाटीमध्ये लिंबूचा रस पिळून घ्या.

  • यानंतर हिरवी मिरची कापून घ्या. आता मिक्सरमध्ये हे सगळ मिश्रण एकजीव करून घ्या.

  • चटणी बारीक करताना तुम्ही चटणीला भरडी ठेवा म्हणजेच चटणीमध्ये जास्त प्रमाणात पाणी (Water) टाकू नका नाहीतर तुमची चटणी पातळ होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com