Sooji Khandvi Recipe : सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा सुजी खांडवी, पाहा रेसिपी

Morning Breakfast : खांडवी बनवण्यासाठी बेसनचा वापर करतात पण आज आम्ही तुम्हाला रव्यापासून बनवलेली खांडवीची रेसिपी सांगणार आहोत.
Sooji Khandvi Recipe
Sooji Khandvi RecipeSaam Tv
Published On

Sooji Khandvi Recipe : गुजराती खाद्यपदार्थांपैकी खांडवी हा एक चविष्ट पदार्थ आहे. गुजरातमधील खांडवी या लोकप्रिय खाद्यपदार्थाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. यामुळे सकाळचा नाश्ता चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही खांडवी हा पदार्थ बनवू शकता.

खांडवी बनवण्यासाठी बेसनचा वापर करतात पण आज आम्ही तुम्हाला रव्यापासून बनवलेली खांडवीची रेसिपी सांगणार आहोत. चवी सोबतच हा पदार्थ अतिशय आरोग्यदायी (Healthy) असतो. चला तर मग जाणून घेऊया सुजी खांडवीची झटपट तयार होणारी रेसिपी.

Sooji Khandvi Recipe
Guava Thandai Recipe : वाढत्या उन्हाळ्यात बनवा पेरुची थंडीई, शरीराला मिळेल गारवा !

1. सुजी खांडवी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • रवा – १ कप

  • दही – १ कप

  • पाणी (Water) – १ कप

  • आले – १ कप

  • हिरवी मिरची – २

  • ग्रीस करण्यासाठी तेल – १ टेबलस्पून

2. फोडणीसाठी लागणारे साहित्य

  • मोहरी – १/२ चमचे

  • पूर्ण लाल मिरची – २

  • हिरवी मिरची – १

  • कढीपत्ता – १ टेबलस्पून

  • तेल (Oil) – २ चमचे

Sooji Khandvi Recipe
Chikoo Peels Recipe : चिकूच्या सालीपासून बनवा चविष्ट असे पदार्थ !

3. कृती

  • आले, दही, हिरवी मिरची, पाणी ,एक वाटी रवा घालून बारीक करा.

  • आता हे तयार मिश्रण गाळणीने गाळून पाच मिनिटांसाठी झाकूण ठेवा.

  • त्यानंतर या मिश्रणात जिरे, चिली फ्लेक्स ,चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला. लक्षात ठेवा मिश्रणाची कन्सिटेंसी फ्लोइंग असावे.

  • आता एका परातीला तेलाने ग्रीस करून त्यावर तयार केलेल्या मिश्रण दोन चमचे परातीवर पसरवा.

  • यानंतर पाणी ठेवून ते गरम करून त्यात दोन मिनिटांसाठी तयार मिश्रण स्टीम करून घ्या.

  • दोन मिनिटं स्टीम केल्याने परात काढून थंड होऊ द्या . त्यानंतर सुरीच्या साह्याने लंबआकार कापून घ्या.

  • हे आता एका पॅनमध्ये तेल टाकून ते टेम्परिंगसाठी गरम करा.

  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून थोडा वेळ तळून घ्या.

  • आता तयार केलेले खांडवीचे रोल कढईत टाकून थोडा वेळ तळून घ्या. आता त्यात चविष्ट सुजी खांडवी सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com