How To Make Soya Idli : सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोयाबीन हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. म्हणून दिवसाची सुरुवात तुम्ही सोयाबीन वडीपासून बनवलेल्या इडलीने करू शकता.
ही सोयाबीन इडली चवदार तर आहेच त्यासोबतच आरोग्यदायी (Healthy) देखील आहे. दिवसभरात तुम्हाला कधीही भूक लागली तर तुम्ही सोयाबीन वडीच्या मदतीने ही इडली सहज तयार करू शकता.
वाढत्या वयातील मुलांसाठी (Child) सोयाबीन खूप महत्वाचे असते तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो. त्यामुळे मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा टिफिन बॉक्समध्ये सोया इडली दिल्यास मुलांचे आरोग्य निरोगी राहील. चला तर मग जाणून घेऊया सोया इडलीची चवदार आणि हेल्दी रेसिपी बनवण्याची पद्धत.
1. साहित्य
सोयाबीन वडी – 1 कप
तांदूळ – 2 कप
मूगडाळ – ½ कप
तेल (Oil) – 1 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
2. कृती
सोया इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि सोयाबीन वडी दोन्ही वेगवेगळ्या भांड्यात भिजत ठेवा. तसेच अर्धी वाटी मूग डाळही भिजवावी.
2-3 तास या सर्व गोष्टी भिजत ठेवा. नंतर तांदूळ घ्या आणि गाळणीत टाका आणि त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून टाका.
आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. याचप्रकारे सोयाबीन वडीही मिक्सरच्या साह्याने बारीक वाटून घ्या आणि आता हीच प्रक्रिया मूग डाळ वाटून घेण्यासाठी पुन्हा करा.
आता एका मोठ्या भांड्यात हे तिन्ही मिश्रण एकत्र टाकून चांगले मिक्स करा.
नंतर यात चवीनुसार मीठ टाका आणि मिश्रण उबदार ठिकाणी 5/6 तासांसाठी ठेवा. त्यानंतर हे मिश्रण घेऊन पुन्हा एकदा फेटून घ्या.
आता इडलीचा साचा घेऊन त्यावर तेलाने ग्रीस करून घ्या आणि त्या साच्यात इडलीचे मिश्रण घालून त्याचे झाकण बंद करा.
आता वाफेवर इडली 10 मिनिटे शिजवून घ्या. नंतर ते एका प्लेटमध्ये काढा. चविष्ट आणि पौष्टिक सोया इडली तयार आहे. सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.