Metabolic Syndrome Google
लाईफस्टाईल

Metabolic Syndrome: थायरॉईडकडे दुर्लक्ष करताय? ह्रदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Thyroid Health: थायरॉईड आणि मेटाबोलिक सिंड्रोम यांचा जवळचा संबंध आहे. योग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव नियंत्रणाद्वारे चयापचय आरोग्य सुधारता येते.

Sakshi Sunil Jadhav

मानेच्या समोर असलेली लहानशी, फुलपाखराच्या आकाराची थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ही ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करते. त्यामुळे वजन, ऊर्जा पातळी, हृदयाचे ठोके, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यावर थेट परिणाम होतो. मात्र मेटाबोलिक सिंड्रोमसारख्या आजारांमध्ये अनेकदा थायरॉईडच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाते. निरोगी शरीरासाठी थायरॉईडची काळजी घेणे हे पहिले आणि आवश्यक पाऊल आहे.

तज्ज्ञांच्या मते, मेटाबोलिक सिंड्रोम असलेल्या चारपैकी एका व्यक्तीला हायपोथायरॉईडीझम असण्याची शक्यता असते. वर्ल्ड थायरॉईड अवेअरनेस मंथनिमित्त थायरॉईड आणि मेटाबोलिक सिंड्रोम यातील हा महत्त्वाचा संबंध समजून घेणे गरजेचे आहे.

मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण, पोटाभोवती वाढलेली चरबी आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या एकत्र येणे. या समस्या एकाच वेळी आढळल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. रक्तातील साखर जास्त असणे, चांगल्या एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणे, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असणे आणि रक्तदाब जास्त असणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात.

हायपोथायरॉईडीझम आणि मेटाबोलिक सिंड्रोम यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. थायरॉईड हार्मोन्स कमी प्रमाणात तयार झाले तर शरीराची चयापचय गती मंदावते. त्यामुळे वजन वाढते, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण वाढते तसेच रक्तदाबावरही परिणाम होतो. भारतात थायरॉईडच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. दहा पैकी एक व्यक्ती हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त असल्याचे आढळून येते.

हायपोथायरॉइडिझमवर बारकाईने लक्ष ठेवा

मुंबईतील केडीए हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टण्‍ट एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. अर्चना जुनेजा म्‍हणाल्‍या, “थायरॉईड ग्रंथी शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी पुरेसे हार्मोन्स तयार करू शकत नाही तेव्हा हायपोथायरॉईडीझम म्‍हणजेच अकार्यक्षम थायरॉईड स्थिती उद्भवते. या संथ गतीने होणाऱ्या प्रक्रियेचा शरीराच्‍या चयापचय क्रियेवर परिणाम होतो, ज्‍यामुळे वजन, रक्‍तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. थायरॉईडचे कार्य मंदावल्यामुळे रक्‍तामध्‍ये एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढू शकते, इन्सुलिनला प्रतिरोध होऊ शकतो आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.''

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सच्‍या प्रमुख डॉ. किन्‍नरा पुट्रेवू म्‍हणाल्‍या, “हायपोथायरॉईडिझमचे अनेकदा सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निदान होत नाही. हायपोथयरॉईडिझम आणि मेटाबॉलिक सिंड्रोमची लक्षणे एकमेकांशी मिळतीजुळती असू शकतात, त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा संबंधित जोखीम घटक असलेल्या प्रत्येकाने नियमितपणे थायरॉईडची तपासणी करणे आवश्यक आहे. तुम्‍हाला या समस्‍यांचा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जाणे अत्यंत आवश्‍यक आहे.''

थायरॉईड ग्रंथी नियंत्रणात ठेवण्‍यासाठी काही उपाय पुढे देण्‍यात आले आहेत.

संतुलित आहार: आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याच्‍या दिशेने पहिले पाऊल

थायरॉईड आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात पौष्टिक घटक असलेल्‍या आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. या पौष्टिक घटकांच्‍या खूप कमी किंवा खूप जास्‍त प्रमाणाचा थायरॉईडच्‍या कार्यावर परिणाम होऊ शकतो. संतुलित आहाराचे सेवन करा आणि अधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सॅच्‍युरेटेड फॅट्स, सोया-आधारित उत्‍पादने आणि गोड पदार्थांचे सेवन कमी करा.

उपचारामध्‍ये सातत्‍यता राखा

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार थायरॉईडच्या औषधांचे वेळापत्रक काटेकोरपणे पालन करा, ज्‍यामुळे उपचार योग्‍य दिशेने सुरू राहिल आणि शरीरातील हार्मोन्‍सचे संतुलन कायम राहिल. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध बंद करू नका किंवा औषधाच्‍या डोसमध्ये कोणताही बदल करू नका.

व्‍यायाम करा

दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये जलदपणे चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारख्‍या सौम्‍य प्रमाणात व्‍यायामामुळे चयापचय क्रिया सक्रिय राहण्‍यास मदत होते. नियमितपणे शारीरिक व्‍यायाम केल्‍याने मेटाबोलिक आरोग्‍य उत्तम राहते आणि हायपोथायरॉईडिझमच्‍या लक्षणांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास, तसेच वजन वाढवण्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होते.

प्रसन्‍न राहा, आरोग्‍यदायी राहा

तणावाचा तुमच्‍या मूडवर, तसेच थायरॉईडवर देखील परिणाम होतो. तणाव वाढतो तेव्‍हा कॉर्टिसोल पातळ्यांमध्‍ये वाढ होते, ज्‍याचा थायरॉईडच्‍या कार्यावर परिणाम होऊ शकतो. आराम करणे आणि स्‍वत:ची काळजी घेणे याद्वारे तणावाचे व्‍यवस्‍थापन केल्‍यास हार्मोनल संतुलन राखण्‍यास मदत होते आणि थायरॉईड आरोग्‍य उत्तम राहते.

हायपोथायरॉईडीझम आणि मेटाबोलिक सिंड्रोम या समस्या अनेकदा एकत्र उद्भवतात आणि एकमेकींना अधिक गंभीर बनवतात. योग्य माहिती, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास या दोन्ही समस्यांचे प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकते आणि निरोगी जीवनशैली राखता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Jio Recharge Plan: धमाल! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दिवसाला फक्त ५ रुपयांचा खर्च; वाचा संपूर्ण माहिती

Kesar Mawa Modak Recipe : माघी गणेश जयंती स्पेशल 'केशर माव्याचे मोदक', रेसिपी फक्त १० मिनिटांत तयार

Silver Price Hike: चांदी तीन लाखापार; किमतीचे विक्रम गाठणाऱ्या चांदीचा दर जानेवारी २०२५मध्ये किती होता,का वाढतेय किंमत? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने धुळे येथील बोराडी गावात विकास कामांची केली पाहणी

SCROLL FOR NEXT