Sakshi Sunil Jadhav
गृहीणींसाठी आज एक मजेशीर आणि सगळ्यात व्हायरल होणारी ट्रीक पुढील मुद्यांमध्ये दिलेली आहे.
तुम्हाला यामध्ये पुऱ्या तळताना तेला ऐवजी पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हार्ट अटॅक, डायबेटीज, वाढता पोटाचा घेर अशा समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
water fried puri
पुढे आपण ही रेसिपी कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत. ही रेसिपी तुमच्यासाठी नवी असली तरी ही जुनी आणि पारंपारिक पद्धत आहे.
पाण्यातली पुरी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गव्हाच्या पीठात, मीठ आणि मिक्स करुन घ्या.
पीठात हळूहळू पाणी घालून कणिक व्यवस्थित घट्ट मळून घ्या. मळलेलं कणीक जास्त सैल ठेवू नका. ते १५ मिनिटं झाकून ठेवा.
पुढे पिठाचे लहान गोळे करुन रोजच्या ठरलेल्या आकारात लाटून घ्या. लाटताना त्याचा आकार हा जाड ठेवा. नाहीतर पुऱ्या पाण्यात तुटतील.
आता एका मोठ्या कढईत पाणी गरम करायला ठेवा. मग त्यात उकळ आल्यावर थोडं मीठ घाला.
मग गॅस मंद आचेवर करुन त्यात पुरी तळायला टाका. ती आधी तळाला बसेल मग आपोआप पाण्यावर तरंगेल. मग २ मिनिटांनी ती चमच्याने हळूच तळा.
पुरीचा रंग लगेचच बदलणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या पाण्यातून काढल्यावर नॉनस्टीकच्या पॅनवर शेकवा. तयार आहेत तुमच्या ऑइल फ्री पुऱ्या.