BloodPressure : घरी BP नॉर्मल, डॉक्टरांकडे जाताच का वाढतो? कारणे आणि चुकीच्या सवयी समजून घ्या

BP Monitoring: घरी रक्तदाब नॉर्मल असूनही डॉक्टरांकडे वाढलेला दिसतो का? यामागे व्हाइट कोट हायपरटेन्शन, तणाव आणि चुकीची तपासणी पद्धत कारणीभूत असू शकते.
blood pressure at home normal
white coat hypertensiongoogle
Published On

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. लोक सध्या बाहेरचं खाणं, दिवसभर कामात व्यस्त राहणं, जेवणाच्या वेळा न पाळणं आणि व्यायाम टाळणं हे रुटीन फॉलो करत आहेत. त्यामुळे रक्तदाब, डायबेटीज, हिमोग्लोबीनचं कमी प्रमाण, डिमेन्शिया, हार्ट अटॅक अशा समस्यांना कमी वयातच लोक सामोरं जातात.

सध्या लोक उच्च रक्तदाब (Blood Pressure) या समस्येला सामोरं जात आहेत. त्यावर लोक उपचारही घेतात. यामध्ये रोजच्या रोज याची तपासणी करणं गरजेचं असतं. यानुसार तज्ज्ञ तुम्हाला तुमचं डाएट किंवा डेली रुटीन सेट करून देतात. पण काहींना घरी रक्तदाब तपासल्यावर कमी आणि डॉक्टरांसमोर तपासल्या वाढलेला रक्तदाब दिसतो. याचं नेमकं कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा डॉक्टर तुमच्या औषधांमध्ये वेगवेगळे बदल करतील आणि तुम्हाला फरकच जाणवणार नाही.

blood pressure at home normal
Jio Netflix offer: आता Netflix चा आनंद फुकटात मिळणार, Jioची धमाकेदार ऑफर, वाचा संपूर्ण माहिती

जर तुम्हालाही घरच्या घरी रक्तदाब मोजला की नॉर्मल येतो, पण डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये तपासणी करताच अचानक वाढलेला दिसत असेल तर याला ‘व्हाइट कोट हायपरटेन्शन’असं म्हटलं जातं. ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णालयात किंवा डॉक्टरांसमोर गेल्यावर अनेक लोक घाबरलेले किंवा अस्वस्थ दिसतात.

याचं कारण म्हणजे त्यांना असणारी चेकअपची भीती, वेटिंग रूममधले वेगळं वातावरण या सगळ्यामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि त्यामुळे BP वाढतो. याशिवाय धावपळ करत रुग्णालयात पोहोचणं, जिने चढणं, कमी झोप, चहा-कॉफीचं सेवन किंवा रक्तदाब मोजताना खूप बोलणं यामुळेही रीडिंग जास्त येऊ शकते. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

जेव्हा तुमचा रक्तदाब अचानक वाढतो आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. तेव्हा हळूहळू हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. पण योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टरांना तुमची योग्य रीडिंग माहित असणं गरजेचं आहे. तुम्हालाही जर हा त्रास असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा.

१. डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी घरच्या घरी रक्तदाबाच्या मशीनने रीडिंग मोजा.

२. रीडिंग मोजण्याआधी पाच मिनिटं शांत बसा.

३. तपासणीच्या अर्धा तास आधी चहा, कॉफी, सिगारेट किंवा व्यायाम करणं टाळा.

४.घरच्या घरी घेतलेली रीडिंग डॉक्टरांना दाखवा. त्याने उपचाराला मदत होते.

डिस्क्लेमर: ही बातमी सार्वजनिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

blood pressure at home normal
High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com