Sakshi Sunil Jadhav
सध्या भारतात Jio सिम कार्ड युजर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यांच्यांसाठी मध्यंतरी रिचार्जच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली होती.
आता Jio युजर्ससाठी मोठ्या प्रमाणात स्वस्त प्लान्स आणले आहेत. पुढे आपण अशाच एका भन्नाट प्लान बद्दल जाणून घेणार आहोत.
Jio युजर्सला प्रत्येक रिचार्ज प्लानमध्ये मोठी सवलत देण्यात येते. ही सवलत म्हणजे एखादं ओटीटी अॅप त्यांना पुर्णपणे मोफत वापरता येतो.
आता Jio च्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये अनेक ऑप्शन्स असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला Netflix मिळू शकतं.
Jio च्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि भरपूर फायदे मिळणार आहेत.
Jio चा हा प्लान 84 दिवसांचा असणार आहे. याचा संपूर्ण डेटा 168जीबी असेल. तर याची किंमत फक्त 1299 रुपये असेल ही स्पेशल ऑफर असणार आहे.
Jio च्या या स्पेशल ऑफरमध्ये जिओ होमचे २ महिने ट्रायल, जिओ हॉटस्टारचं 3 महिने सब्सक्रिप्शन आणि Jio Ai Cloud चं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
तुम्हाला यामध्ये अनलिमेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळणार आहे. हा प्लान 18 महिने हवा असेल तर याची किंमत 35100 रुपये असणार आहे.