ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणं आणि हाडं ठिसूळ होणं. अशा वेळी अगदी लहान धक्का, वजन उचलणं, पडणं किंवा अचानक वाकणं यामुळे देखील कण्यातील हाड मोडणं किंवा त्यावर दाब येणे यालाच ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चर म्हणतात.
जसलोक रूग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. अमित शर्मा म्हणाले की, हा आजार हाडांची रचना कमकुवत होणं आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. ज्यामुळे हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते. जरी ऑस्टियोपोरोसिस प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना प्रभावित करत असला तरी काही वैद्यकीय परिस्थितींमुळे ते तरुणांमध्ये देखील होऊ शकते.
ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चरचे प्राथमिक लक्षण म्हणजे फ्रॅक्चरच्या ठिकाणी वेदना होणं. ही वेदना सामान्यतः बसणं, उभं राहणं किंवा चालणं यांसारख्या वजन उचलण्याच्या क्रियांमुळे आणखी वाढतात.
फ्रॅक्चर झालेला मणका स्पाइनल कॅनलमध्ये आत शिरला तर तो मज्जारज्जू (spinal cord) किंवा मज्जातंतू (nerves) वर दाब निर्माण करु शकतो. ज्यामुळे रेडिक्युलोपॅथी, मुंग्या येणं आणि बधीरपणा येणं, पायांमध्ये कमकुवतपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये किडनी आणि आतड्यांवरील नियंत्रण गमावणं असे आजार उद्भवू शकतात.
सुरुवातीला एक्स-रे काढला जातो. एक्स-रेमुळे फ्रॅक्चर आणि हाडांमधील कॅल्शियमची कमतरता दिसून येते.
जर मज्जातंतू संकुचित होण्याची लक्षणे असतील किंवा शस्त्रक्रिया विचारात घेतली जात असेल तर एमआरआय स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. स्पाइनल स्टेनोसिस म्हणजेच स्पाइनल कॅनल अरुंद झाला आहे का हे स्पष्ट होते. शेजारच्या मणक्यांवरही याचा परिणाम झाला आहे का हे स्पष्ट होते. फ्रॅक्चरमागील अचूक कारण किंवा इतर समस्या दिसून येतात.
ही ऑस्टियोपोरोसिस निदानासाठी चाचणी आहे. DEXA स्कॅन ही हाडांची घनता मोजतो आणि ऑस्टियोपोरोसिसची तीव्रता दर्शवतो.
जेव्हा पेसमेकर किंवा मेटॅलिक इम्प्लांट असलेल्या रुग्णांमध्ये एमआरआय प्रतिबंधित असते तेव्हा सिटी स्कॅनचा सल्ला दिला जातो.
ऑस्टियोपोरोटिक मणक्याच्या फ्रॅक्चरमध्ये उपचारांचे दोन मुख्य उद्दिष्ट असतात-
फ्रॅक्चर झालेल्या मणक्याचं व्यवस्थापन
भविष्यातील फ्रॅक्चर टाळण्यासाठी ऑस्टियोपोरोसिसचे उपचार
बेड रेस्ट: गुंतागुंत रोखण्यासाठी व बरे होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 3-6 आठवड्यांपर्यंत पुरेसा आराम करणे.
ब्रेसिंग : मणक्याला स्थिर करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी बाह्य आधार देणे.
वेदना व्यवस्थापन : वेदनाशामक आणि दाहक-विरोधी औषधांचा समावेश करा.
हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे गरजेचे.
• वेळोवेळी एक्स-रे करून फ्रॅक्चर झालेली हाडं जुळत आहे का याची खात्री करणे
• मणका अजून दाबला जात नाही ना हे तपासणे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.