Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

Cervical cancer symptoms: गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक आहे. तज्ज्ञ सांगतात की, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो.
Cervical Cancer
Cervical CancerSAAM TV
Published On

भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतेय. यामध्ये महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. दरवर्षी जवळपास १.२ लाख नवी प्रकरणं पाहायला मिळतात. महिलांमध्ये सामान्यपणे आढळून येणारा हा तिसरा कॅन्सर आहे. या गंभीर आजारामुळे जवळपास ७० ते ७५ हजार महिलांना यामुळे जीव गमवावा लागतो.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र जर ही लक्षणं वेळेत ओळखली तर या आजारावर मात केली जाऊ शकते. या आजाराची नेमकी लक्षणं काय आहे ती आपण जाणून घेऊया.

सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय?

सर्वायकल कॅन्सर हा महिलांच्या सर्विक्स म्हणजे होणारा कॅन्सर आहे. हा महिलांच्या शरीराचा तो भाग आहे जो गर्भाशयाला जोडतो. या भागात जेव्हा असामान्य पेशी वाढू लागतात तेव्हा एक ट्यूमर तयार होतो. हा ट्यूमर नंतर कॅन्सरमध्ये रूपांतरित होतो. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस.

HPV इन्फेक्शन

सर्वायकल कॅन्सरचं एक प्रमुख कारण म्हणजे HPV व्हायरस. हा व्हायरल महिलांच्या योनी मार्गाद्वारे पसरतो. जवळपास ८० टक्के सर्वायकल कॅन्सरची प्रकरणं ही या व्हायरसमुळेच होतात.

HPV इन्फेक्शनचा धोका कधी वाढतो?

HPV हा दुर्मिळ व्हायरल नाहीये. अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी HPV चा संसर्ग होतो. बहुतेक वेळा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच हा विषाणू नष्ट करते. मात्र धोका तेव्हा वाढतो ज्यावेळी हा व्हायरस दीर्घकाळ शरीरात टिकून राहतो. अशा परिस्थितीत गर्भाशयाच्या सर्वायकल कॅन्सर धोका वाढतो.

Cervical Cancer
Heart Attack: औषधांशिवायही टाळू शकता हार्ट अटॅकचा धोका; 4 सोप्या टीप्सचा करा वापर

एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर

जर एखाद्या महिलेचे एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असतील तर सर्वायकल कॅन्सरचा धोका वाढतो. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणं आणि वारंवार साथीदार बदलणं यामुळे व्हायरल एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहज पसरतो.

धुम्रापानानेही वाढतो धोका

धु्म्रपानाने केवल फुफ्फुसांचा कॅन्सर होतो असं नाही. सिगारेटमध्ये असलेल्या विषारी घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे HPV व्हायरस पसरू शकतो आणि यामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका वाढतो.

Cervical Cancer
Monsoon Mobile Tips: पावसाळ्यात तुमच्या स्मार्टफोनची कशी काळजी घ्याल? 'ही' एक चूक महागात पडू शकते

गर्भनिरोधक गोळ्यांचा सतत वापर

काही संशोधनानुसार, असं समोर आलंय की, ज्या महिला ५ वर्षांपेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात, त्यांना सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक असतो. या गोळ्यांमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होतं आणि त्याचा परिणाम सर्विक्सच्या पेशींवर होतो.

Cervical Cancer
Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com