Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

winter kidney care drinking water: हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि अनेक लोक पाणी कमी प्रमाणात पितात. ही सवय आरोग्यासाठी विशेषतः किडनीसाठी धोकादायक ठरू शकते.
Kidney Transplant Health
Kidney Transplant HealthSaam Tv
Published On

तुम्हाला माहितीये का, हिवाळ्यात किडनीसंबंधीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. थंड हवेमुळे शरीरात अनेक बदल होतात आणि हे बदल किडनीच्या कार्यावर परिणाम करतात. त्यामुळे या काळात किडनीसंबंधीच्या विकारांची लक्षणं दिसून येतात. मात्र योग्य काळजी घेतली तर तुमच्या किडनीच्या आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

मुंबईतील चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. आदित्य नायक म्हणाले की, हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो, शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडतं. अनेकदा रक्ताभिसरण मंदावतं आणि या तिन्ही गोष्टी आपल्या किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. याशिवाय हिवाळ्यात बरेचजण कमी पाणी पितात, जास्त मीठ असलेले पदार्थ सेवन करतात आणि थंडीमुळे घरातच बसून राहतात. हे सर्व बदल आपल्या किडनीच्या कार्यावर परिणाम करतात आणि किडनी कमकुवत करू शकतात.

Kidney Transplant Health
Heart Attack: औषधांशिवायही टाळू शकता हार्ट अटॅकचा धोका; 4 सोप्या टीप्सचा करा वापर

हिवाळ्यात काय त्रास होतो?

कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो, डिहायड्रेशनमुळे मूत्र आणि किडनीवर ताण येऊ शकतो. हिवाळ्यात वारंवार यूटीआयचा त्रास होतो. पाणी कमी पिणं आणि अतिप्रमाणात केलेले खारट पदार्थांचं सेवन हे शरीराच्या द्रव संतुलनावर आणि किडनीच्या कार्यावर परिणाम करतात. इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचा सामना करण्यासाठी पुरेसे पाणा प्या.

तुमचं फुफ्फुस आणि हृदयाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या किडनीच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. हायड्रेशन गरजेचं असून पाणी पिणं हे किडनीसाठी उपयुक्त ठरू शकतं. अल्कोहोल, कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळा. त्याऐवजी ताजी फळं, भाज्या आणि सोडियमचं प्रमाण कमी असलेले पदार्थ निवडा. सोडियम जास्त असलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

Kidney Transplant Health
Cancer Test: या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं

नियमितपणे किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदाबाचे निरीक्षण करा. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं न चुकता घ्या. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करणं टाळा. योगा किंवा चालणं यासारख्या शारीरिक क्रिया रक्त प्रवाह आणि एकूण किडनीचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Kidney Transplant Health
Moles on Your Face: तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहे? पाहा त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो?

ज्यांना दीर्घकाळापासून किडनीचा त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी करून घ्यावी आणि हिवाळ्यात आवश्यक त्या रक्त चाचण्या करुन घ्यावा. त्याचप्रमाणे डायलिसिस रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आहार, औषधं आणि द्रवपदार्थांच्या सेवन करावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com