Moles on Your Face: तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहे? पाहा त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो?

face mole meaning: चेहऱ्यावर असलेले व्यक्तीच्या स्वभाव, भाग्य आणि आयुष्याबद्दल बरेच काही सांगतात. चेहऱ्यावरील खुणा केवळ सौंदर्याचा भाग नसून त्यांचा जीवनावर खोल परिणाम होतो असे मानले जाते.
face mole meaning
face mole meaningsaam tv
Published On

आपल्या त्वचेवर तीळ असतात. काहींच्या हातावर, गालावर किंवा पायावर असलेले तीळ पाहून तुम्ही विचार केला आहे का की त्यांचा खरा अर्थ काय असतो? विज्ञानानुसार तीळ म्हणजे त्वचेतील पेशींच्या (मेलानोसाइट्स) गटांमुळे तयार होणारा डाग असतो. मात्र प्राचीन भारतीय परंपरेनुसार तीळ हे व्यक्तिमत्त्व, नशीब आणि अगदी नियतीशी संबंधित खोल अर्थ दर्शवतात.

तीळ तुम्हाला काय दर्शवतो?

शरीरावर असणारे बहुतेक तीळ हे निरुपद्रवी असतात पण जर त्यांचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलत असेल तर डॉक्टरांना खास करून त्वचारोग तज्ज्ञांना दाखवणं आवश्यक आहे.

face mole meaning
Night light exposure cancer risk: रात्री लाईट सुरु ठेवून झोपत असाल तर होईल कॅन्सर; 440 व्होल्टचा झटका देणारं तज्ज्ञांचं नवं संशोधन

शरीरावरील तीळ आणि त्यांचे अर्थ

कपाळ

जर तीळ मध्यभागी असेल तर ते शहाणपणाचे संकेत आहेत. हे लोक शांत विचार करणारे आणि नैसर्गिक नेते असतात. उजव्या बाजूला असेल तर आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात चांगले नशीब असतं. डाव्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्ती बंडखोर व्यक्तिमत्त्वाचं चिन्ह असतं.

गाल

उजव्या गालावर तीळ असेल तर मजबूत कौटुंबिक मूल्यं आणि निष्ठा याचं ते प्रतीक असतं. डाव्या गालावर तीळ असल्यास तो व्यक्ती गुपितं सांभाळू शकतो. भारतीय सौंदर्य परंपरेनुसार गालावरील तीळ आकर्षक मानला जातो.

face mole meaning
Sleep Depression : कमी झोप बदलतेय तुमचं आयुष्य, परिणाम इतके गंभीर की झोप उडेल, संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

नाक

नाकाच्या टोकावर असलेला तीळ: उतावळेपणा आणि साहसाचे प्रतीक. अशा व्यक्तींना अचानक निर्णय घेणं आवडत.

नाकाच्या बाजूला असलेला तीळ: या व्यक्तींचा सतत मूड बदलेला असू शकतो.

face mole meaning
Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

ओठ किंवा तोंडाभोवती

वरचा ओठावर असलेला ती: अशा व्यक्ती फार मोहक, बोलक्या असतात.

खालचा ओठावर असलेला तीळ: अशा व्यक्ती भावनिक, काळजी घेणाऱ्या आणि खाद्यप्रेमी असतात.

मानेवर असलेला तीळ

जर एखाद्या व्यक्तीच्या मानेवर तीळ असेल तर ती व्यक्ती भावनिक दृष्या फार कमकुवत असतात. अनेकदा त्या इतरांवर अवलंबून असतात.

face mole meaning
Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com