Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Stanford Study: उशिरा झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ८ वर्षांच्या मोठ्या संशोधनात डिप्रेशन, चिंताजनक अवस्था आणि वागणूकीत बदल वाढल्याचं आढळलं आहे.
Stanford Study
Sleep Healthgoogle
Published On

आपल्यापैकी अनेकांना वाटतं की रात्री उशिरा झोपून काम करणं किंवा नेटफ्लिक्स पाहत जागरण करणं आरोग्यासाठी फारसं नुकसानदायक नाही. पण, तुम्ही चुकीचे आहात. तब्बल ८ वर्षे आणि ७० हजारांपेक्षा जास्त लोकांवर करण्यात आलेल्या एका मोठ्या अभ्यासाने उशिरा झोपण्यामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम उघड केले आहेत. हे संशोधन Psychiatry Research जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले असून स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

संशोधनानुसार रात्री १ वाजेपर्यंत झोपणे योग्य मानलं जातं. मात्र, त्यानंतर झोपणाऱ्यांना मानसिक आरोग्यासंबंधी गंभीर समस्या उद्भवू शकतात. संशोधकांनी सांगितले की व्यक्ती सकाळी उठणारा असो किंवा रात्री जागरणारा उशिरा झोपणाऱ्या दोन्ही गटांमध्ये डिप्रेशन, चिंताजनक अवस्था आणि वागणूकीच बदल होण्याचे प्रमाण वाढलेले आढळत आहे.

Stanford Study
Cancer Symptoms: आळशीपणामुळे वाढेल कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली सुरुवातीची लक्षणे

या अभ्यासात सहभागी झालेल्या ७३,८८० लोकांपैकी १९,०६५ लोकांनी स्वतःला 'मॉर्निंग टाइप' म्हटले, तर ६,८४४ लोक 'इव्हनिंग टाइप' म्हणजे रात्री जागणारे होते. बाकीचे लोक हे दोन्ही गटात होते. मानसिक आरोग्य बिघडण्याला कारण तपासल्यास त्यामध्ये जागरण करण्याऱ्या लोकांचा समावेश जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा लोक चुकीचे निर्णय जास्त घेतात आणि त्याचा मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

संशोधकांनी सांगितले की रात्री १ वाजल्यानंतरच्या तासांत आत्महत्येचे विचार, हिंसक वर्तन, अल्कोहोल सेवन, ड्रग्ज आणि अनियमित जास्त खाणे अशा गोष्टींची शक्यता वाढते. त्यांच्या निष्कर्षानुसार सर्वात चांगले मानसिक आरोग्य त्या लोकांचे होते जे सकाळी लवकर उठतात, सूर्यप्रकाशात वेळ घालवतात आणि वेळेवर झोपतात.

लवकर झोपायची सवय कशी लावावी?

लवकर झोपण्याची सवय लावण्यासाठी नियमित झोप वेळ आणि उठण्याची वेळ ठरवणे सर्वात आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही स्क्रीन टाळा आणि ध्यान, वाचन किंवा उबदार पाण्याने आंघोळ करून शरीराला शांत करा. झोपेचं वातावरण शांत, थोडं थंड आणि अंधारात ठेवा. कॅफीन, स्मोकिंग आणि जड जेवण झोपण्यापूर्वी टाळा.

Stanford Study
Sleep Depression : कमी झोप बदलतेय तुमचं आयुष्य, परिणाम इतके गंभीर की झोप उडेल, संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com