Dhanshri Shintre
पावसाळ्यात मोबाईल सुरक्षित राहावा यासाठी लोकांनी काही महत्त्वाच्या आणि सोप्या उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
विद्यार्थी आणि ऑफिसला जाणारे लोक फोन पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पाऊच किंवा कव्हर वापरावं.
पावसात फोन हातात न ठेवता, शक्य असल्यास बॅगेच्या कोरड्या आणि सुरक्षित खिशात ठेवावा.
पावसात फोन भिजू नये म्हणून थेट वापरण्याऐवजी ब्लूटूथ हेडसेट किंवा इअरबड्सने कॉल करा.
फोन ओला झाल्यास ताबडतोब चार्जिंगला लावणे टाळा, अन्यथा उपकरणाला नुकसान होऊ शकते.
फोन पावसात भिजला असल्यास त्याचे कव्हर तात्काळ काढा, कारण ओलसर कव्हर अधिक हानी करू शकते.
फोन भिजल्यास, मऊ, कोरडे आणि लिंट-फ्री कापड वापरून त्यातील ओलावा हळूवारपणे पुसून टाका.