

घराबाहेर असताना काहीही खायचं असेल तर आपण लगेच हँड सॅनिटायझरचा वापर करतो. सॅनिटायझर म्हटलं की, अनेकांना कोरोनाचा काळही आठवतो. कोरोना काळात याचा वापर जास्त झाला. कुठूनही घरी आल्यानंतर हात धुणं आणि सॅनिटायझर लावणं हा जणू नियमच झाला होता.
आजही घर, ऑफिस, शाळा, मॉल, सार्वजनिक वाहतूक अशा सर्व ठिकाणी हँड सॅनिटायझरचा वापर सुरूच आहे. लोकांचा विश्वास आहे की, हे सॅनिटायझर बॅक्टेरिया नष्ट करून आजारांपासून संरक्षण करतात. मात्र नुकतंच हँड सॅनिटायझरमुळे कॅन्सर होऊ शकतो का असा प्रश्न चर्चेत आला आहे.
युरोपियन युनियन सध्या अशा बायोसाइडल प्रोडक्ट्सची माहिती घेत आहे. कारण काही अहवालांमध्ये एथेनॉलच्या वापरामुळे कॅन्सर आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), हात स्वच्छ ठेवण्यासाठी एथेनॉलचा वापर पूर्णतः सुरक्षित आहे आणि नियमित वापराने कोणताही गंभीर धोका उद्भवत नाही.
युरोपियन केमिकल्स एजन्सीने १० ऑक्टोबर रोजी एक अंतर्गत अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये एथेनॉलला संभाव्यतः हानिकारक मानलं गेलंय. या अहवालात म्हटलंय की, एथेनॉल कॅन्सर निर्माण करू शकतो किंवा गर्भधारणेदरम्यान अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे एजन्सीने सुचवलं आहे की, साफसफाईच्या प्रोडक्ट्समघ्ये एथेनॉलऐवजी पर्यायांचा विचार करावा.
ECHA ची बायोसाइडल प्रॉडक्ट्स कमिटी २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान बैठक घेणार असून त्यामध्ये वैज्ञानिक पुराव्यांची माहिती घेण्यात येतेय. जर एथेनॉलला मानवासाठी घातक ठरवण्यात आलं तर त्याचे पर्याय सुचवले जाऊ शकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजवरच्या वैज्ञानिक अभ्यासांनुसार, हँड सॅनिटायझरमध्ये एथेनॉलचा सामान्य वापर कोणत्याही मोठ्या आरोग्याच्या धोक्याचं कारण ठरलेला नाही. कधीकधी किंवा मर्यादित वापर केल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
अमेरिकेच्या CDC आणि FDA च्या मते, एथेनॉल किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझर हेच आजवर हात स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात विश्वासार्ह पर्याय मानले जातात. सॅनिटायझरमध्ये किमान ६०% एथेनॉल असणं आवश्यक आहे, तेव्हाच ते बॅक्टेरिया नष्ट करू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.