High Cholesterol affects Body saam tv
लाईफस्टाईल

High Cholesterol affects Body: वाढलेलं कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरावर कसं वाईट परिणाम करतं? तुम्ही कधी विचारही केला नसेल

High cholesterol effects on body: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणे सहसा दिसत नाहीत. बहुतेक लोकांना वाटते की उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त हृदयविकाराचा धोका वाढणे, पण या पलीकडेही कोलेस्ट्रॉल तुमच्या संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करू शकते

Surabhi Jayashree Jagdish

  • जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

  • मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

  • कोलेस्ट्रॉलमुळे हृदय, मेंदू आणि पायाच्या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतात.

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्स वाढलं की शरीरात चरबी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमधून योग्य प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा पायात दुखणं होऊ शकतं.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांना कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं अधिक आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे उपाय आवश्यक आहे. मुळात आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो हे पाहूयात.

कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग

जास्त एलडीएलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी कडक होते आणि त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. परिणामी हृदयाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही. यामुळे छातीत दुखणं किंवा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.

कोलेस्ट्रॉल आणि स्ट्रोक

केवळ हृदयच नाही, तर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्येही कोलेस्ट्रॉल जमा होऊ शकतं. जर मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह पूर्णपणे बंद झाला तर स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

रक्तवाहिन्यांचे आजार

जास्त कोलेस्ट्रॉलमुळे पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. चालताना पायात वेदना किंवा थकवा जाणवतात. ही लक्षणं पायातील एन्जायनासारखे असतात. यामुळे चालणंही कठीण होतं.

कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी असंतुलित असते. त्यांचं एलडीएल जास्त आणि एचडीएल कमी असतो. यामुळे ट्रायग्लिसराइड्सही वाढलेले असतात. शिवाय मधुमेहात साखर लेपित कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांना लवकर चिकटतो आणि प्लाक तयार करतो, ज्यामुळे धोका अधिक वाढतो.

कोलेस्ट्रॉल आणि Erectile Dysfunction

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम हा पुरुषांच्या लिंगातील रक्तवाहिन्यांवर देखील होतो. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी रक्तप्रवाहात देखील अडथळा येतो. त्यामुळे erectile Dysfunction चा धोका वाढण्याची शक्यता असते.

जास्त कोलेस्ट्रॉलमुळे कोणते आजार होऊ शकतात?

हार्ट अटॅक, स्ट्रोक, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि Erectile Dysfunction.

एलडीएल म्हणजे काय आणि ते हानिकारक का आहे?

एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. ते रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा करून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते.

मधुमेह असणाऱ्यांसाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रण का महत्त्वाचे आहे?

मधुमेहामुळे एलडीएल वाढतो आणि एचडीएल कमी होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे?

संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोलेस्ट्रॉल पायाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो?

कोलेस्ट्रॉल पायाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT