Cleaning Tips For Wooden Kitchenware Saam Tv
लाईफस्टाईल

Cleaning Tips For Wooden Kitchenware : लाकडी भांड्याना वर्षभर टिकवायचे आहे ? तर हे घरगुती उपाय करुन पाहा

How do you clean wooden kitchenware : प्राचीन काळापासून स्वयंपाकघरासाठी लाकडी भांडी वापरली जात आहेत.

कोमल दामुद्रे

Kitchen Hacks : आपल्या स्वयंपाकघरात स्टील, काचेपासून ते अनेक लाकडी भांडी वापरली जातात. प्राचीन काळापासून स्वयंपाकघरासाठी लाकडी भांडी वापरली जात आहेत. पण अलीकडे पुन्हा त्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. कारण ही भांडी दिसायला खूप सुंदर आहेत, त्यामुळे अनेकजण ती भांडी खरेदी करतात.

लाकडामध्ये द्रव शोषून घेण्याची क्षमता असते. अशा स्थितीत त्यात तेल आणि मसाल्यांचे (Spices) डाग सहज लागतात. ज्यामुळे ते स्वच्छ करताना त्यांना उग्र वास येऊ लागतो. आपण अनेकदा स्टीलच्या स्क्रबने ही भांडी घासतो ज्यामुळे त्यांची चमक जाते. तुमच्या महागड्या भांड्यांसह असे होऊ नये, म्हणून आज आम्ही तुम्हाला लाकडी भांडी स्वच्छ (Clean) करण्याचा सोपा आणि योग्य मार्ग सांगत आहोत.

1. लिंबू

लिंबू लाकडी भांड्यांमधून वंगण आणि घाण सहज काढण्यास मदत करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी (Water) घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. नंतर लाकडी कुकवेअर त्यात 10-15 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर सुती कापडाने चांगले पुसून त्याचा वापर करा.

2. व्हिनेगर

लाकडी चमच्यांमधून घाण तसेच दुर्गंधी दूर करण्यासाठीही व्हिनेगर प्रभावी आहे. यासाठी व्हिनेगरमध्ये थोडे मध मिसळा. नंतर त्यात कापसाचा तुकडा बुडवून लाकडी भांड्यांवर घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा.

3. बेकिंग सोडा

लाकडी भांड्यांमध्ये तेल लावल्यामुळे त्यांचा मूळ रंग गमावू लागतो. यात आपण त्याची खोल साफसफाई करण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी आणि बेकिंग सोडा घेऊन पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट लाकडी भांड्यांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर स्पंजच्या मदतीने कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा.

4. मीठ

मऊ स्पंज आणि डिश साबणाने लाकडी भांडी स्वच्छ केल्यानंतर, त्यावर खरखरीत मीठ आणि लिंबू चोळा. 5 मिनिटे असे केल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून टाका. त्यामुळे लाकडी भांड्यांना नवी चमक येते.

5. लाकडी भांडी धुताना हे लक्षात ठेवा

लाकडी भांडी अतिशय नाजूक असतात. ते आरामात वापरण्यासोबतच ते धुताना काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. नाहीतर ते खराब होऊ शकतात. यात लाकडी भांडी धुताना, त्यांना थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे जास्त काळ करू नका. यासह, नेहमी मऊ स्पंजने स्वच्छ करा. स्टील स्क्रब ते कोरडे करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT