Cooker Cleaning Tips : आता काळपटलेला कुकर होईल चुटकीसरशी साफ, मास्टर शेफ पंकजने दिल्या खास टिप्स

Kitchen Tips : तुम्ही सुद्धा कुकर कशा पद्धतीने साफ करावा या गोष्टीमुळे चिंतेत असाल तर, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे.
Cooker Cleaning Tips
Cooker Cleaning TipsSaam Tv

Kitchen Hacks : भारताची सर्वात पहिली मास्टर शेफ पंकज भदौरिया हिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर कुकर कशा पद्धतीने साफ करावा याच्या टिप्स दिल्या आहेत.

तुम्ही सुद्धा कुकर कशा पद्धतीने साफ (Clean) करावा या गोष्टीमुळे चिंतेत असाल तर, हा व्हिडिओ (Video) खास तुमच्यासाठी आहे.

1. अशा पद्धतीने करा प्रेशर कुकर क्लिन :

मास्टर शेफ पंकज असं सांगतात की, प्रेशर कुकर खराब होण्यापासून वाचण्यासाठी त्याला टिशू पेपर लावल्यानंतर शीटी लावून गॅसवर चढवा. असं केल्याने बाहेर येणार मसाल्याचे पाणी (Water) टिशू पेपर शोषून घेईल आणि तुमचा कुकर खराब होण्यापासून वाचेल.

Cooker Cleaning Tips
Kitchen Tips : घाणेरड्या चहा गाळणीला मिनिटांत करा साफ, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

2. अशा पद्धतीने करा जळलेल्या कुकरची साफसफाई :

बऱ्याचदा लक्ष न दिल्याने कुकरमध्ये अन्न जळून जाते. त्यामुळे कुकर आतील बाजूने पडतो. हे काळे डाग डिशवॉशने साफ केल्यानंतर सुद्धा जात नाहीत. अशावेळी तुम्ही कुकरमध्ये बेकिंग सोडा टाकून काहीं वेळ कुकर तसाच ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये गरम पाणी टाकून स्क्रब करा. तुमचं कुकर नव्यासारखा चमकेल.

3. कुकरवर जमलेला मळ कसा साफ करावा :

दररोज कुकर साफ करून सुद्धा कुकरच्या कडेला मळ साचलेला असतो. हा मळ न खरडता साफ करण्यासाठी लिंबू आणि विनेगर मिक्स करून घ्या. त्यानंतर लिंबू आणि व्हिनेगर गरम पाण्यामध्ये घालून कुकर सुद्धा पाण्यात टाकून ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com