
Kitchen Tips : चहाला वेळ नसते, पण वेळाला चहा हवाच, असा हा चहा बहुतांश लोकांच्या आवडीचे पेय आहे. लोकांच्या दिवसाची सुरूवात सकाळच्या एक कप गरमागरम चहाने होते. लोकांमध्ये एक कप चहाने ऊर्जा येते आणि थकवा दूर होतो.
खरेतर भारत हा चहाप्रेमी देश आहे, येथील लोकांच्या आयुष्यात चहाला विशेष स्थान आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बऱ्याच स्वयंपाकघरात (Kitchen) वारंवार चहा बनवला जातो त्यामुळे चहा चाळण्यासाठी वापरली जाणारी गाळण काळीकुट्ट होते. ती काळीकुट्ट झालेली गाळण स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनती घ्यावी लागते.
मात्र तरीसुद्धा गाळणवरील डाग निघत नाहीत. त्यामुळे गाळणवर साचलेल्या घाणीमुळे आरोग्यावर (Health) दुष्परिणाम होतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण आम्ही तुमच्यासाठी सोपा उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या साह्याने तुम्ही गाळण सहज स्वच्छ करू शकता.
1. टूथब्रश आणि डिश वॉशिंग साबण वापरा.
चहा गाळणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश आणि डिश वॉशिंग सोपचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला एका भांड्यात पाणी गरम करून त्यात डिशवॉशिंग सोप मिक्स करायचे आहे. त्यानंतर गाळणीला काही मिनिटे पाण्यात (Water) भिजत ठेवा. आता गाळणीवरील सर्व घाण काढून टाकण्यासाठी टूथब्रशने गाळणीला हळूवारपणे स्क्रब करा. नंतर चाळणी पाण्याने नीट धुवावी.
2. बेंकिग सोडा आणि व्हिनेगर
चहा गाळणी साफ करण्यासाठी बेंकिग सोडा आणि व्हनेगर हा शक्तिशाली आणि सोपा मार्ग आहे. बेंकिग सोडा आणि व्हनेगर वापरण्यासाठी एका भांड्यात बेंकिग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा त्यानंतर चहाचे गाळण त्या मिश्रणात सुमारे एक तासासाठी भिजत ठेवा. नंतर चाळणी पाण्याने नीट धुवावी.
3. उकळत्या पाण्याचा वापर
उकळत्या पाण्याच्या मदतीने तुम्ही चहा गाळण सहज साफ करू शकता. उकळते पाणी चहा गाळणी स्वच्छ करण्यासाठी प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला गरम पाण्याखाली केवळ गाळण ठेवून त्यावर उकळते पाणी टाकायचे आहे. नंतर गाळणवरील शिल्लक कचरा साफ करण्यासाठी ब्रश वापरून पाण्याने धुवून घ्या.
4. लिंबाचा रस
नैसर्गिक अॅसिड म्हणून लिंबाचा रस कार्य करतो. म्हणून गाळण स्वच्छ करण्यासाठी एक लिंबू अर्धा कापून लिंबूचा रस गाळून घ्या. थोडा वेळ लिंबूचा रस चाळणीवर तसेच राहून द्या. त्यानंतर चाळण पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.