Kitchen Hacks : जळलेला तवा चकचकीत करण्यासाठी 'या' घरगुती हॅक्सचा वापर करा

तव्याचा उपयोग आपण पराठे, भाकरी, पोळी करण्यासाठी करतो. बऱ्याच घरात अजूनही लोखंडी तव्याचा वापर केला जातो.
Kitchen Hacks
Kitchen HacksSaam Tv
Published On

Kitchen Hacks : स्वयंपाकघरात रोजच्या वापरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा. तव्याचा उपयोग आपण पराठे, भाकरी, पोळी करण्यासाठी करतो. बऱ्याच घरात अजूनही लोखंडी तव्याचा वापर केला जातो.

हा तवा वर्षानुवर्ष आपण वापर असतो पण आपण यावर पराठे, ब्रेड फ्राय करण्यासाठी तेलाचा खूप जास्त प्रमाणात वापर करतो यामुळे तव्यावर घाण आणि थर साचतो. या सर्व साचलेल्या घाणीमुळे तवा काळाकुट पडतो.

त्यामुळे त्याचा वापर करण्यात अडथळे येत असतात. प्रयत्न केले तरीही त्याचे काळपटपणा कमी होत नाही अशा परिस्थितीत तुम्ही या काही हॅकस वापरून तवा चकचकीत करू शकता.

Kitchen Hacks
Kitchen Hacks : कडाक्याच्या थंडीत भांडी घासण्याचा वैताग येतोय ? फॉलो करा 'या' खास टिप्स

1. पांढऱ्या व्हिनेगरचा वापर

जर तुम्हाला तव्यावर साचलेली घाण काढायचे असेल तर पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करून तुम्ही काढू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडासा लिंबाचा रस चोळा आणि त्यावर पांढरा व्हिनेगर घाला त्यावर तुम्ही थोडे मीठ देखील शिंपडू शकता. यामुळे तुमचे काळे लोखंडी असलेला तवा स्टील सारखा चमकायला लागेल.

2. बेकिंग सोड्याचा वापर

तवा साफ करण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे .एका वाटीत एक चमचा बेकिंग पावडर,मीठ आणि एक चमचा व्हिनेगर मिसळून घ्या. त्यानंतर मऊ स्क्रब सोल्युशन मध्ये बुडवा आणि तवा घासून घ्या त्यानंतर तवा पाण्याने (Water) स्वच्छ धुऊन घ्या.

Kitchen Hacks
Kitchen Hacks : तेलकट व चिवट डब्यांवरचे डाग घालवायचे आहे ? चहापत्ती ठरेल फायदेशीर !

3. मिठाचा आणि लिंबूचा वापर

लिंबाचा वापर करून तुम्ही तवा स्वच्छ करू शकता .त्यासाठी तुम्हाला गॅसवर तवा ठेवा त्यात थोडे पाणी घाला पाणी गरम झाल्यावर त्यावर मीठ पसरून गॅस कमी करा आता स्क्रबच्या मदतीने तवा घासून घ्या तुम्हाला लगेच फरक दिसू नये.

4.ब्लिचिंग पावडरचा उपयोग

तुमच्या घरात जर ब्लिचिंग पावडर उपलब्ध असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने जळालेला तवा साफ करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक कप गरम पाण्यात एक चमचा बेकिंग पावडर टाका आणि त्या तयार द्रावणाने तवा घासून घ्या त्याने तव्यावरील तेलाने (Oil) चिकट झालेले काळे डाग लगेच निघून जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com