कोमल दामुद्रे
स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.
आपल्या प्रिय व्यक्तीशी जोडून ठेवण्यासाठी स्मार्टफोन हा अधिक महत्त्वाचा ठरतो.
स्मार्टफोन हा जितका आरोग्यासाठी धोकादायक आहे तितकाच तो त्वचेसाठी देखील धोकादायक आहे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही सोप्या हॅक आहेत ज्या लोकांना स्मार्टफोनमुळे त्वचेच्या नुकसानापासून वाचवू शकतात.
फोनवर अनेक जंत असतात आपण कानाला फोन लावल्यामुळे ते जंत आपल्या त्वचेवर चिकटून राहातात.
फोन चेहऱ्याच्या अतिजवळ पकडू नका यामुळे बॅक्टेरिया त्वचेवर त्याचे स्थान निर्माण करतात.
अँटीबॅक्टेरियल वाइप्स किंवा ७० टक्के अल्कोहोल असलेल्या कपड्याने फोन पुसण्याचा प्रयत्न करा
तुमचा फोन प्रसाधनगृहात नेणे टाळा.