Home Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Home Remedies : स्वयंपाकघरातील 'या' मसाल्यांचे शरीराला असंख्य फायदे, फक्त रात्री 'हा' उपाय करा

हल्ली आपण जरा जरी आजारी पडलो तरी डॉक्टरकडे जातो परंतु, काही घरगुती उपायांनी आपण आपले अनेक आजार बरे करु शकतो.

कोमल दामुद्रे

Home Remedies : आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपले आरोग्य निरोगी राखले जाते. जितके महत्त्व आरोग्यासाठी आहे तितकेच पदार्थाची चव वाढवण्यासाठी देखील त्याचा फायदा (Benefits) होतो.

हल्ली आपण जरा जरी आजारी पडलो तरी डॉक्टरकडे (Doctor) जातो परंतु, काही घरगुती उपायांनी आपण आपले अनेक आजार बरे करु शकतो.

चला तर मग जाणून घेऊया अशाच 3 मसाल्यांबद्दल जे तुम्हाला सर्दी खोकल्यामध्ये (cold cough), आराम देतील. हाडांचे आरोग्य (bone health) आराम मिळेल. ते मसाले म्हणजे फ्लेक्ससीड, कोरडे आले आणि दालचिनी. हे तिन्ही कोमट पाण्यात प्यायल्याने सांधेदुखी, त्वचा अशा इतर अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.

अळशी, सुंठ आणि दालचिनी पावडरचे फायदे -

1. अळशी, सुंठ आणि दालचिनी पावडर हे तीन मसाले कोमट पाण्यात मिसळून रात्री प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो, ज्या लोकांना बराच काळ त्रास होतो त्यांनी हा घरगुती उपाय अवश्य अवलंबवा. त्यामुळे आतडे व्यवस्थित स्वच्छ होतात.

2. हे तिन्ही मसाले सर्दी-खोकल्यातही खूप फायदेशीर आहेत. बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे. हे विषाणूपासून बचाव करण्यास मदत करते.

3. वयानुसार हाडांच्या समस्या सामान्य असतात. अशा परिस्थितीत ही घरगुती रेसिपी तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे. कधीकधी स्नायूंच्या ताणामुळे किंवा रक्तप्रवाहात येणाऱ्या अडथळ्यांमुळे मज्जातंतू वेदना सुरू होतात. अशा परिस्थितीत हा घरगुती उपाय सर्वोत्तम आहे.

4. हे पदार्थ शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे रात्री प्यायल्याने सकाळी पोट साफ होते. त्वचा सुधारण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितने नेसली 1,65,200 रुपयांची साडी

SCROLL FOR NEXT