World Heart Day 2022 : 'या' पदार्थांमुळे वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वेळीच व्हा सावधान!

जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
World Heart Day 2022
World Heart Day 2022Saam Tv
Published on
Heart Health
Heart HealthCanva

जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, त्याचा उद्देश हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. आपले हृदय आयुष्यभर न थांबता धडधडत असते. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनासाठी, आपण आपल्या हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे

Coffee
CoffeeCanva

कॉफीमध्ये (Coffee) भरपूर कॅलरी आणि फॅट असते, तसेच त्यात असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वाढते. हृदयाला सर्वाधिक नुकसान हे कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे होते, जे रक्तदाब वाढवण्याचे काम करते आणि नंतर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

World Heart Day 2022
World Heart Day 2022 : जागतिक हृदय दिनानिमित्त कोट्स, शुभेच्छा आणि संदेश !
Noddle
Noddle Canva

इन्स्टंट नूडल्स हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ. परंतु याचे नियमितपणे सेवन केल्याने आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतात. यामध्ये तेल आणि सोडियमचा वापर जास्त होतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

French fries
French fries Canva

फ्रेंच फ्राईज खूप गरम तेलात शिजवले जातात, ज्यामध्ये भरपूर सोडियम, ट्रान्स फॅट्स, कार्ब्स असतात, ते आरोग्यासाठी खूप धोकादायक मानले जाते, ज्यामुळे कोरोनरी रोग होण्याची शक्यता असते.

World Heart Day 2022
World Heart Day 2022 : हृदय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या, महत्त्व व त्याचा इतिहास
Pizza
Pizza Canva

पिझ्झा हा बहुतांश तरुणांची पहिली पसंती आहे, पण त्यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यात असलेले चीज कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढवते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Red meat
Red meatCanva

रेड मीटमध्ये भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ असते, त्यामुळे असे मांस महिन्यातून एकदाच खाण्याचा सल्ला दिला जातो. जरी ते प्रथिनांची गरज पूर्ण करत असले तरी, अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com