Weight Loss SAAM TV
लाईफस्टाईल

Weight Loss : व्यायाम करूनही पोट कमी होत नाही? 'या' घरगुती उपायांनी व्हाल स्लिम ॲण्ड फिट

Apurva Kulkarni

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येतात. अनियमित खाण्याच्या वेळा, एका जागेवर बसून काम करणे, फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे, यामुळे तुमचे वजन खासकरून तुमचे पोट वाढते. २१ ते ३० वयातील व्यक्तींमध्ये पोट वाढण्याचे प्रमाणात जास्त आहे. परंतु तुम्ही व्यायामाबरोबरच हे काही घरगुती पेय प्यायल्याने तुमचं वजन लवकर कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ओव्याचं पाणी

ओव्याचं पाणी पिल्यास मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे तुमची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच ओव्याच्या पाण्यामुळे पित्ताशयाची समस्या देखील दूर होते. रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

ग्रीन टी

ग्रीन टी प्यायल्याने मेटॉबालिज्म सुधारण्यास मदत होते. रोज सकाळी ग्रीन टी पिल्यास बेली फॅट लवकर कमी होतात. तसंच ग्रीन टीमुळे तुमचा चेहरा चमकदार दिसायला लागतो.

गरम पाणी आणि लिंबू

गरम पाण्यामध्ये लिंबू घालून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाणी आणि लिंबू प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू पिळून पिल्यानं तुमचं शरीर निरोगी राहील.

मेथीचं पाणी

मेथीचं पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते. मेथीचे दाणे पाण्यात टाकून प्यायल्याने पचन क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे रोज सकाळी जर तुम्ही उपाशी पोटी मेथीचे दाणे पाण्यात उकळून पिल्यास तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

काकडी आणि पुदिन्याचं पाणी

काकडी आणि पुदिन्याचं पाणी प्यायल्याने तुमचं पोट साफ होण्यास मदत होते. तसंच पुदीना हे पोटातील घाण साफ करण्यास मदत करते. काकडी आणि पुदिन्यामुळे पित्ताशयाची आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत होते.

कोरफडीचा ज्यूस

कोरफडीचा ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे. पचन क्षमता वाढण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. रोज सकाळी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने पोट कमी होण्यास मदत होते.

वरील पेयांपैकी एखादे पेय जरी सलग एक महिना ट्राय कराल. तर तुमचं पोट कमी होण्यास मदत होईल. परंतु या गोष्टीसोबत व्यायाम करणं देखील गरजेचं आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT