Mosquito Refill Liquid Saam TV
लाईफस्टाईल

Mosquito Refill Liquid : डेंग्यू-मलेरिया होण्याआधीच सावधान! मच्छरांना पळवण्यासाठी घरीच बनवा रामबाण औषध

Mosquito Refill Liquid Made at Home : काहींनातर श्वसनाच्या देखील समस्या जाणवतात. त्यामुळे मच्छरांना पळवण्यासाठी घरीच बनवल्या जाणाऱ्या लिक्विडबाबत जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठतं. पाणी साठलं आणि ते लगेच साफ केलं नाही की त्यामध्ये मोठ-मोठे मच्छर तयार होतात. मच्छर झाल्यावर लगेचच रोगराई पसरते.

आता सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मच्छरांचं प्रमाण आणखी वाढत जाणार. मच्छर चावल्यावर डेंग्यू, मलेरिया असे भयंकर आजार सुद्धा होतात. त्यामुळे या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही देखील घरी गुडनाईट किंवा अन्य कोणत्या कंपनीचे लिक्वीड आणले असेल मात्र हे मॉस्किटो लिक्विड फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे सतत हे लिक्विड आणल्याने खर्च वाढतो.

शिवाय त्याने काहींना घसा दुखण्याची समस्या जाणवते. बाहेर मिळणाऱ्या मॉस्किटो लिक्विडमध्ये काही प्रमाणात केमिकल मिक्स असते. त्यामुळे लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो. काहींनातर श्वसनाच्या देखील समस्या जाणवतात. त्यामुळे मच्छरांना पळवण्यासाठी घरीच बनवल्या जाणाऱ्या लिक्विडबाबत जाणून घेऊ.

घरच्याघरी मॉस्किटो लिक्विड बनवण्यासाठी आधी एक रिकामी मॉस्किटो लिक्विड बॉटल घ्या. यामध्ये थोडं लिंबांच्या पानांचा रस, खोबरेल तेल टाकून घ्या. त्यात कापूर फोडून त्याचा चुरा मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही छान मिक्स केल्यावर मॉस्किटो लिक्विड मशिनमध्ये बसवा आणि बटन ऑन करा. अशा पद्धतीने तुमच्या घरात एकही मच्छर येणार नाही.

त्यासह तुम्ही सुगंधासाठी यामध्ये फुलांच्या पानांचा रस सुद्धा मिक्स करू शकता. आता तुम्हाला मॉस्किटो लिक्विड नको असेल तर दररोज सायंकाळी एका वाटीत नारळाच्या करवंट्या घ्या. त्यामध्ये कापूर मिक्स करा आणि याचा धूर संपूर्ण घरात करून घ्या. असे केल्याने या धूराने सुद्धा मच्छर तुमच्या घराच्या आसपास सुद्धा भटकणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT