Pune Viral Video
Pune Viral VideoSaam Tv

Pune News: पुण्यात मच्छरांचं वावटळ! डासांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका, VIDEO व्हायरल

Pune News: पुण्यात मुळा मुठा नदीत झालेल्या जलपर्णीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या डासांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नदीवर डासांचे थवे पाहायला मिळाले. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Pune A Mosquito Tornado Viral Video:

पुण्यात मुळा मुठा नदीत झालेल्या जलपर्णीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या डासांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुळा मुठा नदीमध्ये जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे परिसरात खूप जास्त डास झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच डासांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नदीच्या वर आकाशात डासांचे वावटळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुळा मुठा नदीच्या पाण्यात तयार झालेल्या जलपर्णीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत एएनआयने व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत जणूकाही आकाशात डासांचे थवे असल्याचे दिसत आहे. महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. (Latest News)

पुण्यातील केशवनगर, खराडी, मुंढवा या परिसरात डासांचे थवे दिसून आले आहेत. परिसरातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत नागरिकांनी माहिती दिली आहे. 'पुण्यात खर्डी परिसरात खूप जास्त डासांचे प्रमाण वाढले आहे. यावर लवकरात लवकर उपाय करावेत अशी विनंती मी महापालिकेला करत आहे. या डासांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. हे खूप जास्त धोकादायक आहे', असं खराडीतील एका रहिवाशाने सांगितले.

Pune Viral Video
Palghar : जिजाऊ संघटना लोकसभेच्या सात जागा लढवणार : निलेश सांबरे

पुण्यात मुळा मुठा नदीत तयार झालेल्या जलपर्णीमुळे सर्वत्र डासांचे साम्राज्य दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी क्राँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिकेला इशारा देण्यात आला आहे. जर येत्या दोन दिवसात मुळा मुठा नदीची जलपर्णी जर नाही काढली तर पुणे महानगरपालिकांच्या आयुक्तांना नदीवर आलेले जलपर्णी ही सप्रेम भेट च्या स्वरूपात त्यांच्या दालनामध्ये जाऊन देण्यात येईल, असा इशारा पुणे महानगरपालिकेला दिला आहे. याप्रकरणी केशवनगर मुंढवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर नदीत जलपर्णी जमा झाल्याने डासाचे साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Pune Viral Video
Thane Crime News: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न; Video आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com