लोकसभा निवडणुकीत (loksabha election 2024) सात जागा लढवणार असल्याची घाेषणा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे (nilesh sambare latest news) यांनी नुकतीच केली आहे. कोकणात आणि विशेषतः पालघर मध्ये असलेल्या आरोग्य, शिक्षणाच्या समस्या सोडवण्यात येथील लोकप्रतिनिधींना अपयशी ठरले आहेत. जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यावेळी विकास आणि प्रकल्प बाधितांच्या प्रश्नावर आपण निवडणूक लढवणार असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर केले. (Maharashtra News)
आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या हालचालींना वेग देण्याच्या तयारीत आहेत. मात्र असे असताना जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे ह्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
भिवंडी लोकसभा निर्धार मेळाव्यानंतर आता पालघर लोकसभा क्षेत्रातील त्यांचा दुसरा निर्धार मेळावा हा पालघरच्या नागझरी, लालोंडे चार मंदिर मैदानात आयोजित करण्यात आला होता. या निर्धार मेळाव्यालाही निलेश सांबरे यांच्या समाजकार्याने प्रभावित झालेला जनसमुदाय हा लाखोंच्या संख्येने उपस्थित होता. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजकार्याच्या पार्श्वभूमीवर ह्या सभेला मोठी गर्दी जमली होती.
"आतापर्यंत मुक्या बहि-यांचा पालघर जिल्हा म्हणुन अनेकांनी आमच्या या जिल्ह्याला लुटले. ईथल्या आरोग्याबद्दल , ईथल्या शिक्षणाबद्दल , रोजगारांच्या समस्यांबाबत ना जिल्हा प्रशासनाला घेणे देणे नाही की लोकप्रतिनिधीना आतापर्यंत फक्त योजानांच्या नावाखाली गोर गरीब आदीवासी, शेतकरी , कष्टकरी यांची होत असलेली फसवणुक आता जिजाऊ सहन करणार नाही.
आम्हांला निवडणुकांची हौस नाही. पण ज्यांना निवडुन दिले त्यांनी आपली जबादारी झटकली आहे . म्हणुनच जिजाऊच्या विचारांवर चालणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिजाऊ निवडणुकीला उभी करेल आणि जिंकुन आणुन दाखवेल असे सांगत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना खुले आव्हान दिले.
पेसा कायद्याला निलेश सांबरे यांचा विरोध आहे असे सर्वत्र माझ्या नावाने विरोधकांकडुन अपप्रचार केला जात आहे . मी पेसा कायद्याविरोधात कुठलीही याचिका टाकली नसुन माझ्या जिल्ह्यातील मुलांना शिक्षकांची कमतरता असताना इथल्या शिक्षक जिल्ह्याबाहेर सोडु नये अशी याचीका मी टाकली होती. माझ्यावर खोटे आरोप करणा-याxनी आरोप सिद्ध केल्यास मी जनतेसमोर मरण पत्करेन असे देखील पालघर लोकसभा क्षेत्रासाठी आयोजित जिजाऊ संघटनेच्या भव्य निर्धार मेळाव्यात सांबरे म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या प्रसंगी भुमीसेना आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष काळुरामदादा दोधडे यांनी देखील उपस्थिती लावत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तर उपस्थित असलेले जनादेश वृत्तपत्राचे संपादक कैलाश म्हापदी यांनी दिवसरात्र समाजसेवेचा वसा घेतलेल्या निलेश सांबरे सारखी व्यक्ती जर राजकारणात येत असेल तर समाजासाठी ते नक्कीच एक आशादायी चित्र आहे. त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहण्याची वेळ आली आहे असे सांगितले.
यावेळी जिजाऊचे वाडा तालुक्यातील सारशी गावचे उच्च शिक्षित असलेले सरपंच दिनेश कोदे यांनी निलेश सांबरे यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती देत त्यांच्या कार्याने समाजात होत असलेले सकारात्मक बदल याविषयी सांगितले . तर आतापर्यंत आदिवासी समाजाच्या साधेपणाचा फायदा घेउन त्यांची फसवणुक करणा-या आदिवासी नेत्यांवर सडकुन टिका देखील केली.
यावेळी आदिवासी युवक अर्जुन तांडेल यांनी देखील जिजाऊ संघटेनेची खोटी बदनामी करणाऱ्यांवर आपल्या भाषणातुन टिकेची झोड उठवली.
जिजाऊ संघटना भिवंडी, पालघरसह कोकणातील काही लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीनेच या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेचे हे शक्तीप्रदर्शन होत आहे असे मानले जाते.
पंधरा दिवसांपूर्वीच जिजाऊ संघटनेचा शहापूरमधील वाशिंद येथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा तब्बल दीड लाख लोकांचा निर्धार मेळावा पार पडला होता. जिजाऊच्या या विधायक शक्तीची सत्ताधारी तसेच विरोधकांना दखल घ्यायला लागणार असुन येणा-या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे हे नाव हुकमी एक्का ठरणार असे जाणकारांकडुन बोलले जात आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमिकरण, शेती, रोजगार, युवा अशा विविध विविध माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जिजाऊ संघटनेने मोठे सामाजिक काम उभे केले आहे. या सामाजिक कार्याचे गारूड सर्वसामान्यांवर येथील वंचित, शोषित, आदिवासी, शेतकरी, महिला वर्गावर आहे. त्याच भावनेतून या निर्धार मेळाव्यासाठी विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, मनोर, वाडा, पालघर, बोईसर या तालुक्यांमधून लाखभर जिजाऊ समर्थकांनी व महिलांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती.
याप्रसंगी धनवंत तिवारी (सदस्य बोर्ड सल्लागार समिती नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय), सामाजिक कार्यकर्ते आणि मर्चंट नेव्ही अधिकारी गणेश पाटील, साजिद शेख यांसह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.