Obc Janmorcha : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ओबीसी जनमोर्चा मराठवड्यातील सर्व जागा लढवणार, नांदेडचा उमेदवारही ठरला?

मराठवाड्यात सर्व जागा ताकदीनिशी लढवणार असल्याचे मराठवाडा विभागीय संघटक एडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितले.
Prakash Shendge
Prakash ShendgeSaam tv
Published On

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

ओबीसी जनमोर्चाच्या रूपाने आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रंगत येणार असल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा (lok sabha election 2024) आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेंडगे (prakash shendge) यांनी केली आहे. (Maharashtra News)

त्यादृष्टीने जनमोर्चाने सुरुवातही केली आहे. मराठवाड्यात इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरू केली आहे. मराठवाड्यात सर्व जागा ताकदीनिशी लढवणार असल्याचे मराठवाडा विभागीय संघटक एडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून लवकरच लोकसभेचे उमेदवार अंतिम केले जातील असे भोसीकर यांनी नमूद केले.

Prakash Shendge
Papaya Rate Hike : नंदुरबारमध्ये पपई उत्‍पादक शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण, जाणून घ्या नवा दर

विशेष म्हणजे नांदेड लोकसभा लढवण्यासाठी स्वतः एडव्होकेट अविनाश भोसीकर हेच इच्छुक असून त्यांची उमेदवारी निच्छित झाल्याचे मानले जात आहे. भोसीकर यांनीच नांदेडमध्ये झालेल्या ओबीसीच्या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांना आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भोसीकर यांच्या उमेदवारीने नांदेड लोकसभेत रंगत वाढणार हे मात्र निश्चित.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Prakash Shendge
Bjp Protest : धुळे, सातारा, परभणी, नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राहूल गांधींविराेधात आंदाेलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com