Thane Crime News: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न; Video आला समोर
Fake Gun Terror Attempt Bhiwandi Crime
सध्या राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळं दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. या घटना ताज्या असतानाच भिवंडी (Bhiwandi) शहरातील ठाणगे आळी परिसरात दोन तरुणांमधील जुन्या वादातून हाणामारी झाली. त्यानंतर हवेत गोळीबार झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Latest Crime News)
प्रसंगावधान बाळगून काही युवकांनी त्यांच्याकडील बंदूक हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील प्रसंग टळला. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं (Terror Attempt in Bhiwandi) होतं. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडील बंदूक जप्त केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल
बंदूक जप्त केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की, ही बंदूक खरी नसून नकली ( (Fake Gun) एअरगन आहे. त्यामुळं पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ही एअरगन पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला (Thane Crime News) आहे.
ठाणगे आळी परिसरातील तुषार खाडेकर व नारायण भोइर यांच्यात जुना वाद आहे. नारायण भोईर यांचा पुतण्या उमेश भोईर व कृष्णा चव्हाण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. भिवंडी शहरातील ठाणगेआळी परिसरात कृष्णा चव्हाण यांनी तुषार खाडेकर याला विचारलं की, नारायण काकाबरोबर तु उगाच का भांडण करतो? यावरून कृष्णा आणि तुषार खाडेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर भांडण सुरू (Crime News) झालं.
एअरगनने केला हवेत गोळीबार
त्यानंतर कृष्णानी मिखंज पटेल यास आपल्या मदतीसाठी बोलावलं. यादरम्यान तुषार खाडेकर व मिखंज पटेल यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मिखंज पटेलच्या कमरेला बंदूक होती. त्यानी बंदूक काढून हवेत फायरिंग (Air Gun Terror Attempt) केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु ही बंदूक असली नसून एअरगन ((Air Gun) असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. सध्या पोलिसांनी तुषार खाडेकर आणि मिखंज पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडील ही नकली बंदूक जप्त केली आहे. पुढील तपास निजामपूर पोलीस करीत (Fake Gun Terror Attempt) आहेत. शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.