Home Decoration Saam TV
लाईफस्टाईल

Home Decoration : जुन्या बांगड्या फेकून देण्याऐवजी सजवा घर; डेकोरेशन पाहून सर्वच करतील कौतुक

Decorate Home With Old Bangles : बांगड्या घरात अशाच पडून राहतात. मात्र या बांगड्यांचा घरातील किंवा अन्य काही शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीला आपलं घर छान आणि सजवलेलं हवं असतं. घर जितकं छान असेल तितकं प्रसन्न वाटतं. त्यामुळे घरात आपण विविध शोभेच्या वस्तू आणतो. काही व्यक्ती महागड्या वस्तू खरेदी करून शोपीस किंवा अन्य शोभेच्या वस्तू बनवतात. घर सजवण्यासाठी फक्त शोभेच्या महागड्या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. घरातल्या साध्या, जुन्या आणि वापरत नसलेल्या वस्तूंपासून देखील तुम्ही घर सजवू शकता.

ज्या घरात महिला आहेत तिथे विविध रंगिबेरंगी बांगड्या असणारच. नवीन ड्रेस घेतला की त्यावर नवीन मॅचींग रंगाच्या बांगड्या मुलींना हव्या असतात. आता नवीन बांगड्या घेतल्यावर जुन्या बांगड्या तशाच पडून राहतात. किंवा आपल्याला त्या लहान होतात. बांगड्या घरात अशाच पडून राहतात. मात्र या बांगड्यांचा घरातील किंवा अन्य काही शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

बांगड्या विविध रंगाच्या, काचेच्या, स्टीलच्या आणि डिझाइनच्या असतात. कधी कधी बांगड्यांच्या सेटमधील एक बांगडी हारवली म्हणून सुद्धा मुली त्या बांगड्या वापरत नाहीत. मात्र यापासून तुम्ही सुंदर डेकोरेशनच्या वस्तू बनवू शकता.

फोटो फ्रेम

जुन्या बांगड्यांपासून फोटो फ्रेम बनवता येते. त्यासाठी आधी एक कार्डबोर्ड घ्या. त्यावर चौकट तयार करून घ्या. कार्डबोर्डवर तयार केलेल्या चौकटमध्ये तुम्ही बांगड्यांचे तुकडे चिटकवू शकता. त्यासाठी आधी कार्डबोर्डला तुम्हाला हवा तो रंग आधी लावून घ्या. त्यानंतर त्यावर बांगड्यांचे तुकडे तोडून चिकटवा.

कँडल स्टँड

मेनबत्ती प्रत्येक घरात असते. काही व्यक्ती जेवताना कँडल लाइट डिनर किंवा देव्हाऱ्यात अथवा लाईट गेल्यावर मेनबत्ती वापरतात. आता ही मेनबत्ती सतत पडते किंवा तिचे मेन नेहमी वाया जाते. अशावेळी तुम्ही बांगड्यांच्या मदतीने स्वत: कँडल स्टँड बनवू शकता. त्यासाठी काचेच्या काही समान आकाराच्या बांगड्या घ्या. या बांगड्या एकावर एक ठेवा आणि छान चिटकवून घ्या. तयार झालं कँडल स्टँड.

वॉल हँगिंग

घर सुंदर दिसण्यासाठी सर्वव्यक्ती वॉल हँगिंगचा वापर करतात. तुम्ही जुन्या बांगड्यांपासून वॉल हँगिंग सुद्धा बनवू शकता. त्यासाठी सर्व बांगड्या जमिनीवर ठेवा आणि पिरॅमिड शेपममध्ये बांधून घ्या. त्यानंतर या बांगड्या तुम्ही विविध काचा, स्टॉ, आयस्क्रिम स्टिक्स यापासून आणखी सजवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT