Holi 2024,Effective Tips To Remove Holi Color From Eyes  Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : होळी खेळताना डोळ्यात किंवा कानात रंग गेल्यावर काय करावे? या गोष्टी लक्षात ठेवा

Effective Tips To Remove Holi Color From Eyes : अनेक रंग खेळताना चुकून तो आपल्या डोळ्यात, कानात किंवा तोंडात गेला तर... अशावेळी काय कराल? डोळ्यांचे आणि इतर इंद्रियांची काळजी कशी घ्याला जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

How To Remove Holi Color From Eye And Mouth :

अवघ्या काही दिवसात होळीच्या रंगांची उधळण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळेल. २४ मार्चला होळी आणि दुसऱ्या दिवशी २५ मार्चला धुलिंवदनाचा सण साजरा केला जाईल.

होळीचा रंग आपल्या आयुष्यात अनेक रंगीबेरंगी आनंद घेऊन येतो. सध्या बाजारात अनेक केमिकलयुक्त रंग पाहायला मिळतात. जे लवकर निघत नाही. यामुळे चेहरा (Skin) आणि केसांवरील रंग काढण्यासाठी आपण साबणाचा किंवा शाम्पूचा वापर करतो.

अनेक रंग खेळताना चुकून तो आपल्या डोळ्यात, कानात किंवा तोंडात गेला तर... अशावेळी काय कराल? डोळ्यांचे आणि इतर इंद्रियांची काळजी (Care) कशी घ्याला जाणून घेऊया.

1. होळीचा रंग तोंडात गेल्यावर काय होईल?

होळीच्या (Holi Festival) रंगांमध्ये अनेक केमिकलयुक्त घटक असतात ज्यामुळे आरोग्याला हानी होऊ शकते. चुकून हा रंग पोटात गेला तर उलट्या होऊ शकतात. याशिवाय तोंडाची संपूर्ण चव खराब होते. होळीचा रंग चुकून तोंडात गेला तर तोंड स्वच्छ धुवा. तसेच काहीही खाताना हात चांगले स्वच्छ धुवावेत. याशिवाय पाण्याने गुळणा करु शकता.

2. डोळ्यात रंग गेल्यावर...

होळीचे रंग डोळ्यात गेल्यावर जळजळ किंवा खाज येण्याची समस्या होऊ शकते. रंग डोळ्यात गेल्यावर त्वरीत थंड पाण्याने डोळे धुवा. थंड पाणी शिंपडल्यानंतर जळजळ होत असेल तर गुलाबपाणी वापरा. गुलाब पाण्याने डोळ्यांना थंडावा मिळतो. तसेच डोळ्यांवर बर्फ देखील चोळू शकतात.

3. रंग कानात गेल्यावर...

तज्ज्ञांच्या मते रंग कानात गेल्यास संसर्गाचा धोका वाढतो. होळी खेळताना चुकून तो कोरडा रंग कानात गेला असेल तर तो साफ करुन निघू शकतो. अशावेळी इअरबड्सचा वापर करु शकता. रंग काढता कान दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT