Sour Milk Face Serum Saam TV
लाईफस्टाईल

Sour Milk Face Serum : अर्रर्र! दूध फाटलंय? चुकूनही फेकून देऊ नका; घरच्याघरी बनवा Face Serum, चेहऱ्यावर येईल ग्लो

Ruchika Jadhav

उन्हाळ्यात किंवा दूध जूनं झालं की ते फाटतं. दूध फाटल्यावर अनेक व्यक्ती त्यापासून पनीर बनवतात किंवा त्यापासून खवा बनवतात. मात्र बऱ्याच मुलींना हे सर्व बनवणे आवडत नाही. अनेक व्यक्ती दूध फक्त चहासाठी वापरतात. त्यामुळे ते फाटल्यावर फेकून देण्याशिवाय त्यांना कोणताच मार्ग दिसत नाही. मात्र अशाच व्यक्तींसाठी आम्ही या फाटलेल्या दूधाचा ब्यूटी प्रोटक्टसाठी होणारा उपयोग सागंणार आहोत.

उन्हाळ्यात किंवा अन्य वातावरणात देखील चेहऱ्याची त्वाचा बऱ्याचदा ड्राय होते. स्किन ड्राय झाल्यावर काही जण मॉश्चराइजर वापरतात. मात्र त्याने स्किन चिकट वाटते, त्यामुळे तुम्ही सिरम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खास आहे. कारण आपण आज फाटलेल्या दूधापासून सिरम कसं बनवायचं याची महिती जाणून घेणार आहोत.

फाटलेल्या दूधापासून सिरम बनवण्यासाठी साहित्य

१ वाटी फाटलेल्या दूधाचे पाणी

१ चमचा ग्लिसरीन

१ चिमुट मीठ

सिरम बनवण्याची कृती

सर्वात आधी फाटलेल्या दूधातून एक वाटी पाणी बाजूला काढून घ्या.

जर दूध फाटलं नसेल आणि तुम्हाला हे सिरम बनवायचं असेल तर दूधात लिंबाचा रस मिक्स करा. दूध लगेच फाटेल.

फाटलेल्या दूधाचं पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यानंतर यामध्ये ग्लिसरीन आणि मीठ मिक्स करा.

त्यानंतर हे पाणी एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा.

या बॉटलला स्प्रे असल्यास उत्तम त्याने तुम्हाला चेहऱ्यावर झटपट सिरम अप्लाय करता येईल.

असं अप्लाय करा

सर्वात आधी सिरप अप्लाय करताना चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर सिरम स्प्रे करा. चेहरा सुकल्यानतंर तुम्ही पाण्याचा हात घेऊन चेहऱ्यावर मसाज करू शकता. तसेच नंतर चेहरा धुवून टाका.

सिरमचे फायदे

सिरममुळे आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. आपली त्वचा कोमल राहते. डाग आणि पुरळ निघून जातात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी चेहऱ्यावर सिरम अप्लाय करावे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्हीने या माहितीचा दावा केलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT