Ayurvedic Beauty Tips : महागड्या क्रिम आणि लोशनला करा बायबाय; वाचा स्वस्तात मस्त आयुर्वेदिक ब्युटी टिप्स

Tips For Healthy and Glowing Skin : अनेकदा मुली आपल्या सौंदर्यासाठी विविध महागड्या क्रिम चेहऱ्यावर अप्लाय करतात. मात्र त्याने चेहरा आणखी खराब होतो. चेहऱ्यावर अॅकने येतात.
Ayurvedic Beauty Tips
Ayurvedic Beauty TipsSaam TV

बदलत्या हवामानानुसार आपल्या स्किनवर त्याचा परिणाम होताना दिसतो. त्वाचा कोमल राहण्यासाठी सर्वच मुली विविध कॉसमेटीक्सचा वापर करतात. मात्र याने त्वचेच्या समस्या आनखी वाढतात. विविध प्रक्रिया करून जबरदस्तीने मिळवलेल्या सौंदर्याला काही अर्थ राहत नाही. नौसर्गिक सौंदर्य कायम सर्वात उठून दिसतं.

Ayurvedic Beauty Tips
Beauty Skin Tips : काळ्या अंडरआर्म्समुळे चार माणसांत हात वर करण्याची लाज वाटतेय? मग 'या' टिप्सने झटपट गायब होईल डार्कनेस

अनेकदा मुली आपल्या सौंदर्यासाठी विविध महागड्या क्रिम चेहऱ्यावर अप्लाय करतात. मात्र त्याने चेहरा आणखी खराब होतो. चेहऱ्यावर अॅकने येतात. डाग पडतात, तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढतात. काही मुलींच्या चेहऱ्यावर लाल डाग देखील पडतात.

पंचकर्म आयुर्वेदात याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलींनी कोणत्याही महागड्या कॉस्मेटीक क्रिम न वापरता पुढील गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत.

त्वचा कोरडी ठेवू नका

त्वचा कोरडी झाल्यावर ती फार रुक्ष होते. त्यानंतर त्वचा फाटते किंवा त्यावर सुरकुत्या देखील पडतात. त्यामुळे त्वचेत कायम मॉश्चर राहील याचाी काळजी घ्या. त्यासाठी वेळोवेळी पाणी प्या. तसेच चेहरा धुतल्यानंतर त्यावर मॉश्चराइजर अप्लाय करा. किंवा गरम तेलाने देखील चेहऱ्यावर काही वेळ मालीश करा.

दररोज व्यायाम करा

शरीराला व्यायाम करण्याची सवय असावी. त्याने डोक्यावरचा ताण कमी होतो. दररोज व्यायाम केल्याने आपले आरोग्य देखील निरोगी राहते. इतकेच नाही तर रक्त भिररण देखील चांगले राहते. त्यामुळे दररोज व्यायाम केल्यास त्वाचेचं आरोग्य देखील चांगलं राहतं.

चांगली झोप घ्या

आरोग्यातील सर्वच गोष्टींसाठी झोप फार महत्वाची असते. झोप पूर्ण न झाल्यास आपली सतत चिडचिड होत राहते. ती चिडचिड आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. त्यामुळे झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. झोप चांगली झाल्यास तुमच्या चेहऱ्यावर देखील त्याचा चांगला रिजल्ट दिसून येईल.

आयुर्वेदानुसार त्वचेच्या सुंदरतेसाठी या काही सिंपल टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. यामुळे सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला महागड्या क्रिमची गरज भासणार नाही.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या टिप्सचा दावा करत नाहीये.

Ayurvedic Beauty Tips
Bridal Beauty Tips : लग्नाच्या किती दिवस आधी फेशिअल करायचं? जाणून घ्या ब्रायडल ब्युटी टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com