Bridal Beauty Tips : लग्नाच्या किती दिवस आधी फेशिअल करायचं? जाणून घ्या ब्रायडल ब्युटी टिप्स

Bridal Facials Tips : लग्नामध्ये आपण सर्वांत खास आणि सुंदर दिसावे यासाठी नवरी लग्नाच्या दिवसांमध्ये आपल्या चेहऱ्याची फार काळजी घेते. हेवी मेकअप करताना नवरीला आधी स्किन प्रिपेअर करावी लागते.
Bridal Beauty Tips
Bridal Beauty TipsSaam TV

प्रत्येक मुलगी आयुष्यात नवरी होण्याचं स्वप्न पाहते. या दिवशी नवरी विविध दागिने आणि साजश्रृंगार करत स्वत:ला सजवते. नवरी सुंदर दिसण्यासाठी काही दिवस अधिपासूनच फेशिअल, ब्लिच अशा विविध गोष्टी करत असते.

Bridal Beauty Tips
Dog Attack On Bride: भरलग्नमंडपात नवरीमागे कुत्रा लागला; पाहुण्यांची पळापळ, पाहा VIDEO

लग्नामध्ये आपण सर्वांत खास आणि सुंदर दिसावे यासाठी नवरी लग्नाच्या दिवसांमध्ये आपल्या चेहऱ्याची फार काळजी घेते. हेवी मेकअप करताना नवरीला आधी स्किन प्रिपेअर करावी लागते. फेशिअल करण्याचा देखील एक कालावधी असतो, वेळेत फेशिअल न केल्यास त्याचा आपल्या स्किनवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज अशात काही ब्रायडल ब्युटी टिप्स जाणून घेऊ.

१. जर तुमचे लग्न ठरणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला आधीपासूनच स्किन प्रिपेअर करावी लागेल. जर तुमच्या चेहऱ्यावर फार पिंपल्स असतील तर लग्नाच्या सहा महिने आधीपासून ट्रिटमेंट सुरू करा. तसेच महिन्यातून किमान २ वेळा फेशिअल करा. तसेच लग्नाला ३ महिने बाकी असताना तुम्ही एक ते दोन आठवड्यांनी फेशिअल करणे सुरू केले पाहिजे.

2. एखाद्या ब्रायडलला क्सिनशी संबंधित काही समस्या नसतील तर तिने तीन महिने आधी फेशिअल करण्यास सुरूवात करावी. चेहरा चांगला असताना देखील जास्त प्रोडक्ट किंवा ट्रीटमेंट करू नये. त्याने स्किन खराब होण्याचे चान्सेस असतात.

3. ब्रायडल होण्याआधी फक्त फेशिअल ट्रिटमेंट पुरेशी नसेत. त्यासह ब्राईडला आयब्रो, वॅक्स, मेनिक्युअर, पेडीक्युअर अशा ट्रिटमेंट देखील घेणे गरजेचे असते. या ट्रिटमेंट मेहंदीच्या लागण्याआधी पूर्ण झाल्या पाहिजेत. हळद लागल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही ट्रिटमेंट घेऊ नका.

Bridal Beauty Tips
Eye Care Tips: सतत Screenवापरून डोळ्यांवर येतोय ताण? करा 'हे' घरगुती उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com