Face Serum at Home : घरच्याघरी बनवा इफेक्टीव Face Serum; कमी खर्चात येईल सेलिब्रीटी सारखा ग्लो

Fashion Beauty Tips : महागड्या आणि केमिकलयुक्त सिरमपासून स्वतःची त्वचा वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक होममेड सिरम सांगणार आहोत. या सिरममुळे कमी खर्चात अभिनेत्रीप्रमाणे ग्लो मिळेल.
Fashion Beauty Tips
Face Serum at HomeSaam TV
Published On

उन्हाळ्याच्या दिवसात आपली त्वचा भरपूर प्रमाणात काळवंडते आणि डल दिसू लागते. यासाठी आपण महागडे मॉइश्चरायजर तसेच चेहऱ्याला ताजेतवाणे ठेवण्यासाठी सिरम देखील वापरतो. बाहेरचे सिरम वापरून त्वचेवर चांगलाच ग्लो येतो परंतु बाहेरचे सिरम सतत वापरल्याने काही कालांतराने चेहरा डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे या महागड्या सिरमपासून स्वतःची त्वचा वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक होममेड सिरम सांगणार आहोत. या सिरममुळे कमी खर्चात अभिनेत्रीप्रमाणे ग्लो मिळेल.

Fashion Beauty Tips
वारंवार चेहरा धुण्याची सवय योग की अयोग्य? दिवसातून किती वेळा करावे Face Wash

हे घरगुती सिरम बनवण्यासाठी तुम्हाला काहीच पैसे मोजावे लागणार नाहीयेत. सोबतच या सिरममुळे तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.

जाणून घ्या सिरम बनवण्यासाठीचं साहित्य :

1. एक विटामिन ई कैप्सूल

2. दोन चमचे गुलाबजल

3. दोन विटामिन सी कॅप्सूल

4. एक चमचा ग्लिसरीन

5. एक चमचा कोरफडीचा गर

तुम्हाला एका वाटीमध्ये कोरफडीचा गर घ्यायचा आहे. त्यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी, विटामिन ई आणि सी कॅप्सूल सोबतच एक चमचा ग्लिसरीन ऍड करून हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्हाला एका स्वच्छ काचेच्या छोट्या बॉटलमध्ये स्टोअर करायचं आहे. काचेच्या बॉटलमध्ये सिरम जास्त वेळ टिकतं.

वापरायचं कसं?

1 . तुम्ही हे सिरम रात्री झोपताना लावू शकता. मात्र सिरम अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा चेहरा एका फेसवॉशने क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही सिरम लावू शकता.

2. जर तुम्ही दिवसा सिरम लावणार असाल तर, मॉइश्चरायजर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. दिवसा आपण काही ना काही कारणासाठी घराबाहेर पडतो. त्यामुळे फक्त सिरम लावल्यास त्याचा त्वचेवर वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना आधी फेस सिरम अप्लाय करा.

3. चेहऱ्यावर सिरम लावल्यानंतर बाहेर जायचे असल्यास लगेचच मेकअप करू नका. सिरम आपल्या स्किनमध्ये पूर्णपणे अॅबसॉर्ब झाल्यानंतरच मेकअप अप्लाय करा. अन्यथा त्वचेवर मेकअप फिक्स होत नाही.

4. सध्या सिरम स्प्रेच्या स्वरुपात देखील मिळतं. घरी बनवलेलं हे सिरम देखील तुम्ही चेहऱ्यावर वापरू शकता. या काही सिंपल टिप्स फॉलो केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सेलिब्रेटीसारखा ग्लो येईल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Fashion Beauty Tips
Homemade Serum For Hair : कितीही महागडे सीरम लावा केस कडकच होताय ? घरच्या घरी बनवा असे सीरम, मिळेल सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com