Homemade Serum For Hair : कितीही महागडे सीरम लावा केस कडकच होताय ? घरच्या घरी बनवा असे सीरम, मिळेल सुटका

Kesansathi Gharguti Serum : केसांसाठी सीरम टॉनिकसारखे काम करते. तसेच ते बाहेरच्या प्रदूषणापासून केसांचे रक्षण करते.
Hair Serum
Hair SerumSaam Tv
Published On

Hair Care Tips : हल्ली बाजारात अनेक महगाडे सीरम आपल्याला पाहायला मिळतात. केसांसाठी सीरम टॉनिकसारखे काम करते. तसेच ते बाहेरच्या प्रदूषणापासून केसांचे रक्षण करते. सीरम केसांची चमक वाढवते आणि त्यांना सीलकी लुक देते.

सीरमचा वापर केल्याने तुमचे केस चमकदार आणि निरोगी दिसतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे सीरम उपलब्ध आहेत, जे खूप महाग आहेत. परंतु, कितीही महागडे सीरम वापरले तरी केस फ्रीजी होतात अशावेळी आपण वैतागतो. पण नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपण घरच्या घरी सीरम बनवू शकतो. ज्यामुळे आपल्या केसांना त्याचा फायदा होईल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Hair Serum
Home Remedies For White Hair: पांढऱ्या केसांना डायची गरज नकोच! हा आयुर्वेदिक उपाय करुन पाहा, केस होतील काळेभोर व दाट

1. कोरफड

कोरफडमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आहेत जे तुमचे केस (Hair) मऊ करण्यास मदत करतात. त्यापासून सीरम बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे ताजे कोरफडीचे जेल घ्या . त्यात १ चमचा जोजोबा तेल घाला. हे मिश्रण ओल्या केसांवर लावा, सुमारे 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Hair Serum
Weekly Rashibhavishy In Marathi : मिथुन-कन्याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी तर कुंभने बाळगा सावधगिरी ! जाणून घ्या कसा असेल येणारा आठवडा

2. एवोकॅडो सीरम

एवोकॅडोमध्ये भरपूर जीवनसत्त्वे (Vitamins) असतात. याच्या सीरममुळे केस जाड आणि मुलायम राहतात. हे सीरम बनवण्यासाठी एका भांड्यात पिकलेला एवोकॅडो मॅश करा आणि त्यात 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला. ही पेस्ट ओल्या केसांवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर शॅम्पूने केस धुवा. एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात, जे केसांना हायड्रेशन आणि मऊपणा देतात.

3. मध आणि योगर्ट सिरम

मध आणि दही (Curd) या दोन्हीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे तुमचे केस मऊ आणि पोषित ठेवण्यास मदत करतात. सीरम बनवण्यासाठी एका भांड्यात २ चमचे दही घ्या. त्यात १ चमचा मध घाला. चांगले फेटून झाल्यानंतर हे मिश्रण केसांना लावा. 20-30 मिनिटांनी केस चांगले धुवा.

Hair Serum
Prarthana Behere : कपाळी चंद्रकोर, केसात गजरा, प्रार्थानाच्या साडीवर साऱ्यांच्या नजरा...

4. गुलाब पाणी आणि ग्लिसरीन सीरम

गुलाबपाणी आणि ग्लिसरीनमध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतात. याचा वापर करून तुम्ही केस मऊ आणि हायड्रेटेड ठेवू शकता. हे सीरम बनवण्यासाठी एका भांड्यात गुलाबजल आणि ग्लिसरीन समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत टाका आणि तुमच्या ओलसर केसांवर शिंपडा. याचा वापर केल्याने तुमचे केस मऊ होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com