Home Remedies For Grey Hair: हल्ली वय वाढण्याआधीच पांढऱ्या केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. अशावेळी आपण नवीन गोष्टी ट्राय करण्याच्या फंद्यात पडतो परंतु, असे करणे आपल्या केसांसाठी अधिक घातक आहे.
केसांना (Hair) काळे करण्यासाठी आपण हेअर डाय वापरतो किंवा इतर प्रोडक्टचा वापर करतो त्यांना केस काळे होण्याऐवजी ते अधिक पांढरे होतात त्यामुळे आपल्या अधिक चिंता वाटू लागते. खाण्यापिण्याची बदलेली जीवनशैली, सततचे टेन्शन (Stress) व केसांना पुरेशा प्रमाणात न मिळणारे पौष्टिक पदार्थ यामुळे केसांची वाढ ही खुंटते व केस अकाली पांढरे होतात. आयुर्वेदात (Ayurvedic) अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला केसांच्या समस्येपासून मुक्त करु शकते. जाणून घेऊया त्याबद्दल
1. पित्तदोष
आयुर्वेदात असे म्हटले आहे की, पोटात अधिक उष्णता वाढली की, केस पांढरे होतात. त्यामुळे आपण आहारात पांढरे, थोड्याप्रमाणात आंबट व गोड पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील पित्तदोष कमी होऊ शकतो.
2. नियमितपणे डोक्याची मालीश
जर तुम्ही केसांना तेल लावत असाल तर त्याची योग्य प्रकारे मालीशही करा. बहुतेक वेळा आपण केसांच्या मुळांशी अधिक तेल लावतो व त्यांना आहे तसेच सोडून देतो. त्यामुळे केसांची वाढ होत नाही. खरेतर केसांची वाढ होण्यासाठी आपण डोक्याची नियमित मालीश करायला हवी ज्यामुळे स्काल्पला योग्य प्रमाणात पोषण मिळते व केसांची वाढ होते.
3. हर्बल हेअर पॅक
केसांना हर्बल पॅकचा वापर करा. ज्यामध्ये आवळा, कडुलिंब, खोबरे, शिककाई इत्यादींची पेस्ट टाळूवर लावली जाते. ही पेस्ट किमान ४५ मिनिटे ठेवा. यामुळे शरीरातील पित्तदोष कमी होतो व केसांची वाढही होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.