Hair Serum : केस गळतायत ? केसांची वाढ खुंटलीये ? फक्त 10 रुपयात बनवा हेअर सीरम

How To Made Hair Serum At Home : केस गळणे किंवा कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Hair Serum
Hair SerumSaam Tv
Published On

Hair Care Tips : केस गळणे किंवा कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये हवामानाचाही एक घटक असून उन्हाळ्यात केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश आणि घामामुळे केसांचे खूप नुकसान होते.

याशिवाय केसांची काळजी (Hair) न घेतल्याने केस पातळ होऊ लागतात किंवा झपाट्याने गळू लागतात. केसांच्या (Hair) काळजीमध्ये उत्पादनांचा वापर देखील जड असू शकतो कारण त्यात रसायने असतात.

Hair Serum
White Hair Problem : कमी वयात केस पांढरे का होतात ? या 5 पदार्थांचे सेवन नियमित करा, आठवड्याभरात होतील काळे व घनदाट

केसांची काळजी घेण्याच्या घरगुती उपायांनी निरोगी (Healthy) आणि चमकदार केस मिळू शकतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टी स्वस्त आहेत आणि त्याद्वारे केसांची वाढ देखील सुधारली जाऊ शकते. 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या या गोष्टींनी तुम्ही घरच्या घरी हेअर सीरम बनवू शकता.

स्वस्त आणि सर्वोत्तम DIY हेअर सीरम

जेवणाची चव वाढवणारा कांदा केसांची निगा राखण्यासाठीही उत्तम मानला जातो. कांद्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट आणि इतर अनेक घटक असतात जे केसांची चांगली काळजी घेऊ शकतात. घरी कांद्याचे केस सीरम बनवण्यासाठी तुम्हाला कांदा, चहाची पाने आणि पाणी लागेल. तुम्हाला 2 ते 3 छोटे कांदे, एक छोटा चमचा चहाची पाने आणि एक ग्लास पाणी लागेल.

Hair Serum
Hair Serum : 'या' व्यक्तींनी लावायला हवे हेअर सिरम, जाणून घ्या त्याचे फायदे!

असे केस सीरम बनवा

सर्व प्रथम एका पातेल्यात पाण्यात चहाची पाने टाका आणि गरम करा. एक उकळी आल्यावर कांदा कापून त्यात टाका. थोडा वेळ शिजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. नंतर एका स्प्रे बाटलीत ठेवा आणि वापरा. या हेअर सीरममुळे केसांच्या वाढीसह अनेक फायदे होतील.

कांदा आणि कढीपत्ता

कांद्याप्रमाणे कढीपत्ता देखील केसांसाठी फायदेशीर मानला जातो. या दोन्ही गोष्टी मिसळून केसांना लावल्यास दुप्पट फायदा मिळू शकतो. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात कढीपत्ता उकळवा. यानंतर त्यात कांद्याचा रस किंवा त्याचे तुकडे टाका. तुमचे हेअर सीरम तयार आहे. कढीपत्त्यामुळे खाज येणे, केस गळणे आणि इतर समस्या दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com