White Hair Problem : कमी वयात केस पांढरे का होतात ? या 5 पदार्थांचे सेवन नियमित करा, आठवड्याभरात होतील काळे व घनदाट

Hair loss Problem : हल्ली अनेक कमी वयाच्या लोकांना केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते.
White Hair Problem
White Hair ProblemSaam tv
Published On

How To Get Black Hair Naturally : आपले केस हे आपल्या चेहऱ्याचे मुख्य आकर्षण असतात. मोठे घनदाट काळेभोर केस आपला आत्मविश्वास वाढवतात. पण हल्ली अनेक कमी वयाच्या लोकांना केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते.

अगदी शाळेत असलेल्या मुलांचे केस देखील अकाली पांढरे झालेले दिसतात. या समस्येवर उपाय म्हणून आपण केस (Hair) काळे करण्यासाठी बाजारातील कृत्रिम रंग आपल्या केसांना लावतो. परंतु त्याचा प्रभाव फार काळ टिकत नाही आणि 15 दिवसांतच केस जशास तसे होऊन जातात.

White Hair Problem
Natural Hair Conditioner : केसांसाठी केमिकल फ्री कंडिशनर हवाय ? स्वयंपाकघरातील हा पदार्थ वापरुन पाहा, केस होतील सिल्की व शाइनी

अनेकदा यात असलेल्या केमिकल्समुळे आपल्या केसांचे नुकसान होते. या समस्येवर आहारतज्ज्ञ मनप्रित यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत केसांच्या अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर काही नैसर्गिक उपाय सुचवले आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1. आवळा

आवळा (Aamla) आपल्या शरीराला अनेक पोषकतत्त्वे पुरवणारा स्त्रोत म्हणून ओळखला जातो. चवीला आंबट-गोड असलेले हे फळ पूर्वीपासूनच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांना पोषण देण्यासाठी ओळखले जाते. आवळ्यामध्ये असलेले 'क' जीवनसत्त्व (Vitamins) आणि अँटिऑक्सिडेंट्स केसांच्या मुळांना पोषण पुरवतात आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतात. केस गळणे व पांढरे होणे अशा समस्यांना दूर करण्यासाठी आवळा उपायकारक ठरतो. एवढेच काय तर डोकेदुखी, पित्त, लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर, पोट साफ न होणे इत्यादी समस्यांसाठी देखील तो गुणकारी ठरतो.

White Hair Problem
Home Remedies For White Hair: अकाली पिकलेल्या केसांना काळे, घनदाट करायचे आहे ? मग तेलात मिसळा हा पदार्थ, पुन्हा कधीच होणार नाहीत पांढरे

2. कढीपत्ता

आपण आपल्या रोजच्या जेवणात वापरत असलेला कढीपत्ता फक्त पदार्थ चविष्ट बनवत नाही तर त्यातील पोषकतत्त्वे शरीराच्या अनेक व्याधी दूर करण्यास मदत करतात. कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडेंट्स, लोह आणि जीवनसत्त्व केसांच्या मुळांना पोषण पुरवतात, केसांच्या वाढीस मदत करतात आणि केस पांढरे होण्यापासून थांबवतात. पातळ केसांना घनदाट करतात, कोंड्याच्या समस्येस देखील दूर करतात.

3. गाजर

गाजर हे 'अ' जीवनसत्त्वाचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्या सुधारते हे आपल्याला माहीत आहेच परंतु, गाजर खाल्याने आपल्या केसांना देखील अनेक आवश्यक पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो. गाजरातील 'अ' जीवनसत्त्वामुळे टाळूचे आरोग्या सुधारते आणि केसांचा रंग कायम राखण्यास मदत होते. त्याचबरोबर केसांची गळती थांबून मुळे मजबूत करण्यास देखील मदत करते. त्यासोबतच त्वचेच्या समस्या, कँसर, मधुमेह, ब्लड प्रेशर, पचनाच्या समस्या, महिलांच्या मासिक पाळी संबंधित समस्या इत्यादी गंभीर समस्यांवर देखील उपायकारक ठरते.

White Hair Problem
Mithila Palkar : तेनू काला चश्मा..., मिथिलाचा नवा स्वॅग

4. मेथीचे दाणे

मेथीत असलेली प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते व केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येचे निवारण होते. मेथीच्या दाण्यांची पेस्ट केसांना लावल्यास तुम्हाला फरक जाणवू शकतो. सोबतच मधुमेह आणि वजनवाढीच्या समस्येवर मेथी गुणकारक ठरते.

5. आक्रोड

आक्रोडातील बायोटिन, जीवनसत्त्व 'ई', फॅटी अॅसिड्स, ओमेगा 3 हे केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. केसांची गळती रोखतात व केस पांढरे होण्यापासून थांबवतात. आक्रोडाचे तेल केसांच्या वाढीस फायदेशीर आहे. त्याच बरोबर आक्रोडाच्या सेवनाने त्वचा निखारण्यास देखील मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com