Hindustan Petroleum Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Hindustan Petroleum Recruitment 2023: तरुणांनो तयारीला लागा! हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ३०० जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

HPCL Recruitment 2023 : अनेक तरुणांचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

कोमल दामुद्रे

HPCL Job Vacancy : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीत जवळपास ३१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अनेक तरुणांचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.

या अर्जाची शेवटची तारीख ही १८ सप्टेंबर आहे. त्यासाठी लवकरच तरुणांनी अर्जाचे फॉर्म भरायला हवे. जाणून घेऊया अर्जाची प्रक्रिया कशी असेल ते.

1. कोणत्या जागांसाठी भरती.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)च्या विविध विभागांमध्ये अभियंता, अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 300 अधिक पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने (Company) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल ट्रेडमधील अभियंता पदांसह इतर पदांसाठी नियमितपणे भरती केली जाणार आहे.

2. कसा कराल अर्ज (Apply) ?

  • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार HPCL, hindustanpetroleum.com च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.

  • अर्जाची शेवटची दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.

3. अर्जाची फी (Fees)

  • अर्ज करताना, अनारक्षित, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 1180 रुपये शुल्क भरावे लागेल.

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

4. पात्रता

  • विविध विभागांमधील अभियंता पदांसाठी, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये 4 वर्षे पूर्णवेळ नियमित पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • इन्फॉर्मेशन सिस्टम्स (IS) ऑफिसरच्या पदांसाठी, संगणक विज्ञान / IT अभियांत्रिकीमध्ये 4 वर्षांचे B.Tech किंवा MCA असणे आवश्यक आहे आणि वय 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

SCROLL FOR NEXT