Highest Waterfall In Satara : डोंगरदऱ्यातून कोसळणारा साताऱ्यातील सगळ्यात उंच धबधबा पाहिलात का?

कोमल दामुद्रे

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा हा सातारा जिल्ह्यात आहे.

सातारा

भांबावली वजराई धबधबा महाराष्ट्रातील सातारा शहरापासून अवघ्या २७ किमी अंतरावर आहे.

उंची

सह्याद्री टेकडीजवळ वसलेला असून त्याची उंची सुमारे ८५३फूट (२६०मी)आहे.

मेघालय

मेघालयातील ३३५ मीटर (1100 फूट )खाली असलेल्या नोहकालिकाई धबधब्यानंतर हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा होत आहे.

कसे जाल?

सातारा एसटी स्टँडवरुन वैयक्तिक वाहन किंवा आलावाडी बसने आपण येथे पोहोचू शकतो.

उरमोडी धरण

उरमोडी धरण प्रकल्प या धबधब्याच्या नदीवर आधारित आहे. उरमोडी नदीचे जन्मस्थान वजराई धबधब्यापासून सुरु होते.

पर्यटक

धबधब्याच्या आजूबाजूला उरमोडी धरण, ठोसेघर धबधबा आणि सज्जनगड किल्ला अशी अनेक आकर्षणे आहेत जी पर्यटकांना भुरळं घालतात.

नंदनवन

ट्रेकर्सप्रेमींसाठी हे नंदनवन आहे. या धबधब्याच्या पायथ्याकडे जाणारा मार्ग शांत साहसी पण पावसाळ्यात अतिशय धोकादायक आहे.

Next : त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

Turtiche Fayde | Saam tv