Sleep Problems Saam TV
लाईफस्टाईल

Sleep Problems : रात्रभर झोप लागत नाही; सावधान! तुम्हालाही होऊ शकतो 'हा' जिवघेणा आजार

Health Tips : लक्षण न समजणारा आजार झाल्यावर त्यावर लगेचच उपचार घेता येत नाही. परिणामी आजार बळावतो आणि आणखी वाढत जातो.

Ruchika Jadhav

सध्याचे दैनंदिन जीवन इतके बदलले आहे की अनेक व्यक्तींना आरोग्याशी संबंधीत विविध समस्या आहेत. डोके दुखी, दमा, सर्दी-खोकला या आजारांवर त्वरीत उपचार घेता येतो. मात्र लक्षण न समजणारा आजार झाल्यावर त्यावर लगेचच उपचार घेता येत नाही. परिणामी आजार बळावतो आणि आणखी वाढत जातो.

अनेक व्यक्तींना झोपेच्या विविध समस्या असतात. रात्री लवकर झोप लागत नाही. झोप न लागणे, रात्रभर जागे राहणे अशा आजारांकडे अनेक व्यक्ती दुर्लक्ष करतात. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला किंवा उपचार न घेतल्यास आपल्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

इंसोम्निया

इंसोम्निया हा झोपेचा एस गंभीर आजार आहे. यामध्ये व्यक्तीला रात्रभर झोप लागत नाही. डोळ्यांवर भरपूर झोप असून डोकं शांत होत नाही आणि झोप येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर देखील चिडचिड होते, तणाव वाढतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या समस्या मोठ्याप्रमाणात जाणवतात.

स्लिपींग एपनिया

स्लिपींग एपनिया हा देखील मोठा आजर आहे. यामध्ये त्या व्यक्तीला रात्रीच्यावेळी श्वास घेताना त्रास होतो. श्वास घेताना सतत श्वास अडकतो त्यामुळे झोपमोड होते. ज्या व्यक्ती जास्त घोरतात त्यांना या समस्या अधिक जाणवतात. शक्यतो लठ्ठ व्यक्तींना हा आजार होतो. यामुळे काही काळाने व्यक्तीचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखू लागतं.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम

लेग्स सिंड्रोममध्ये व्यक्तीच्या पायांना सतत एक वेदना जाणवते. त्यामुळे व्यक्ती सतत पाय हालवत राहतात. अशी समस्या रात्री झोपताना जास्त जाणवतात. झोपल्यावर त्या व्यक्तीला सतत पायांची विशिष्ट हालचाल करावी वाटते. यामुळे पाय देखील दुखू लगतात. जेनेटीक किंवा काही व्हिटॅमीन कमी असल्याने या समस्या होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT