ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलवत्या ऋतूमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
सर्दी खोकला आणि ताप या समस्यांमुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांना त्रास होतो.
दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कफ वाढवणारा आहार दही, दूध, ताक, साबुदाणा, केळी हे पदार्थ खाऊ नयेत.
थंड पदार्थ खाणे टाळावे. खूप तहान लागली तरी थंड पाणी, पेये याचा मोह टाळावा.
धूम्रपान करू नये. हे व्यसन असेल तर दम्याचा धोका वाढतो.
एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण करणे, थंड हवेत फिरणे टाळावे.
पोट नेहमी साफ ठेवा. मैदा, त्याचे पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, खणं टाळावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.