Heart Blockage Treatment Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Blockage Led Death : 90 टक्के हार्ट ब्लॉकमुळे त्या मॅरेथॉनपटूचा मृत्यू, डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिला?

Mumbai Marathon : आशियातील सर्वात मोठी तसेच बहुचर्चित असलेली मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा रविवारी सकाळी पार पडली. मुंबईतील हजारो नागरिक उत्स्फूर्तीने या स्पर्धेत भाग घेतला. ही मॅरेथॉन स्पर्धा चालू असताना एक दुर्देवी घटना घडली.

Shraddha Thik

Doctors Advise :

आशियातील सर्वात मोठी तसेच बहुचर्चित असलेली मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा रविवारी सकाळी पार पडली. मुंबईतील हजारो नागरिक उत्स्फूर्तीने या स्पर्धेत भाग घेतला. ही मॅरेथॉन स्पर्धा (Marathon Competition) चालू असताना एक दुर्देवी घटना घडली. मॅरेथॉनमध्ये धावत असताना दोन स्पर्धकांचा अघाती मृत्यू झाला. त्या दोन स्पर्धकांचे नाव राजेंद्र चंदमल बोरा (वय 74) आणि सुव्रदीप (वय 45) अशी मृतांची नावे आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना दोघेही अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही अकाली मृत्यू झाल्याचे समजले. दरम्यान सुव्रदीप यांना हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्याने ते मृत पावले असे सांगण्यात आले.

याबाबत फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख डॉ पवन साबळे यांनी माहिती दिली आहे. 'सुव्रदीप यांना सुमारे 80-90% ब्लॉकेज होते ज्यात मुख्यतः डाव्या अँटीरियर डिसेंडिंग (LAD) धमनी- हृदयाची सर्वात मोठी धमनी आहे जी हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पाठवते. त्यांना तणाव आणि थकवा एकत्रीत आल्यामुळे तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शन झाले असावे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असवा. मॅरेथॉनमध्ये धावताना नेहमी स्वतः च्या शरीराची सर्वप्रथम काळजी घ्यायची असते.'

सध्या हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांचे प्रमाणा वाढले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या आजाराने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत कार्डिऑलॉलिस्ट डॉ अजित मेनन यांनी सांगितले की, कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भाग घेताना तुमच्या शरीराची संपूर्ण तपासणी करावी. विशेषत: 35-45 वयोगटातील हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये वाढ झाली आहे.

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. विजय डिसिल्वा, मॅरेथॉनमधील वैद्यकीय पार्टनर यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, किडनीचे आजार तसेच मधुमेह अशा शारीरिक तपासण्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भाग घेताना कराव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT