Maharashtra Live News Update :मुंबई आमचीच, कुणाच्या बापाची नाही, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना दम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ०९ जून २०२५, आज भारत बंद, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Uddhav Thackeray: मुंबई आमचीच, कुणाच्या बापाची नाही, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना दम

गिरणी कामगारांच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत मनसेचे नेत्यांनीही या मोर्चामध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा बाण सोडला. गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्या, अशी मागणीही यावेळी ठाकरेंनी केली. अदानीचे टॉवर मुंबईत नको.. वांगणी, शेलू तिकडे बांधा, इथे घरे गिरणी कामगारांनाच द्या. सत्ताधाऱ्यांना गिरण्यांचा इतिहास माहिती नाही, असे वाटतेय. मुंबई तोडण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठीच्या मुळावर येईल, त्याला उखडून टाकू. मुंबई आमचीच आहे, कुणा बापाची नाही, असा थेट इशारा ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला.

समृद्धी महामार्गावर बस आणि पिकअपचा अपघात

समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वरील चेनेज 279 वर मेहकर नजिक खाजगी प्रवासी बस व पिकप चा अपघात.

अपघातात दोन्ही वाहनातील एकोणावीस प्रवासी जखमी दोघांची प्रकृती गंभीर.

दोन्ही वाहने नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती

पावसामुळे वाहन घसरल्याने एकमेकांना धडकलीत.

अपघातानंतर काही वेळ मुंबई कॉरिडॉर वरील वाहतूक झाली होती विस्कळीत.

जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) दाखल!

आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या वादळानंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) सक्रिय झाले आहे. एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, आता कॅन्टीनच्या अन्नसुरक्षेची पोलखोल होणार आहे.

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे पोलीस ठाण्यात दाखल करणार तक्रार

खोट्या GR प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

राज्यात सध्या खोट्या शासकीय निर्णय (GR) प्रसारित करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया ताई सुळे या उद्या स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

या खोट्या GR मुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गैरसमज पसरत असून, शासकीय यंत्रणांची विश्वासार्हताही धोक्यात येत आहे. याविरोधात कठोर कारवाई व्हावी, दोषींना अटक व्हावी, आणि अशा घटनांवर लगाम बसावा यासाठी सुप्रिया ताईंनी पुढाकार घेतला आहे.

 पहिल्या पावसात भंडाऱ्यातील भोजापूर गावातला कॅनल मार्गावरील पूल वाहून गेला...

मुसळधार पावसात भोजापूर येथील एक्सप्रेस सिटीकडे जाणाऱ्या कॅनल मार्गावरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल. मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भंडारा जिल्ह्यात अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली अशातच भोजापुर येथील हा पूल मुसळधार पावसात पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने नागरिकांना आता सामना करावा लागणार आहे, निकृष्ट दर्जाच्या बांधकाम केल्याच्या आरोप आता भोजापूरवासीय करीत आहेत.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद

दरवर्षी पावसाळ्यात भुयारी मार्गात साचते पावसाचे पाणी..

सद्या पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्गावरील वाहतूक बंद..

रेल्वे क्रॉसिंगमुळे धामणगाव शहर दोन विभागात वसले असताना भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास..

कांदिवलीत एटीएम सेंटरला लागली आग

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज मधील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम ला लागली आग

ठाकूर व्हिलेज मधील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एटीएम सेंटरमध्ये ही आग सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लागली

मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

नाशिकमध्ये कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगारांचा मोर्चा

* कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कामगारांचा मोर्चा

* नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात

* बेरोजगारी भत्ता, शासकीय निमशासकीय जागा भरणे, आरक्षणाची अंमलबजावणी, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची हमी, समान काम समान वेतन यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा

- हजारो कामगार उतरले रस्त्यावर, सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

Wardha: वर्ध्यात देवळी तालुक्यातील ५ रस्ते वाहतुकीसाठी बंद

देवळी तालुक्यातील पाच रस्ते वाहतुकीसाठी बंद

देवळी तालुक्यातील आंजी ते अंदोरी रस्ता गंगापूर नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद

सरूळ येथे यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा ते राळेगाव रस्ता बंद

डिगडोह येथील तात्पुरता बनविण्यात आलेला पूल खचल्याने देवळी ते डिगडोह रस्ता बंद

रायपूर खुर्द येथील नाल्याला पूर आल्याने रायपूर खुर्द ते कोल्हापूर सिंगरवाडी रस्ता बंद

वर्ध्यात यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोह गावाचा तुटला संपर्क

- अल्लीपूर आलमडोह मार्ग रात्रीपासुन बंद

- अलमडोह गावाच्या वेशीवर पोहचले यशोदा नदीचे पाणी

- यशोदा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली

- यशोदा नदी शेजारील शेती गेलीय खरडून

- शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे सुद्धा गेले वाहून

- वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

वेळ नदीवरील पुलाला मोठं भगदाड, अपघाताचा धोका

वेळ नदी पात्रातुन पुलाखालुन पाणी वाहत असल्याने आणि सिमेंटचा काही भाग खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी ये-जा करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने हा पूल दुरुस्त करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

नागपूरच्या पावसाच्या आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Nashik: नाशिक जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल

- जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

- साम टीव्हीच्या बातमीची राज्य सरकारकडून गंभीर दखल

- जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं मुंबईला पाचारण

- महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारने मागवला

- जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर

- 8 दिवसांपासून या प्रकरणाची विशाखा समितीकडून चौकशी सुरू

Nashik: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला, २२०५ क्यूसेक वेगानं पाणी सोडलं

नाशिक -

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

- सकाळी ९ वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

- सकाळी ९ वाजल्यापासून गंगापूर धरणातून २२०५ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत देखील होणार घट

- तर दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी करत ५४९८ क्युसेक करण्यात आला

Nashik: नाशिकमध्ये सकाळपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू

- नाशकात सकाळपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू

- नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या बाहेर संप सुरू

- वर्कस फेडरेशन, एसइए, मागासवर्गीय संघटनेचे सभासद संपात सहभागी

- एकदिवसीय संपात ३०० कर्मचारी संपात सहभागी

- खाजगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी देण्यात आली होती संपाची हाक

- संपाची शासनाने दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी

शरद पवार आझाद मैदानावर दाखल

शरद पवार आज शिक्षकांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. ते शिक्षकांची संवाद साधत आहे. विनाअनुदानित शिक्षकांचं आज आंदोलन सुरु आहे.

पावसामुळे शहादा बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य

सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या शहादा बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था....

ठिकठिकाणी पाण्याचे डबके,घाण चिखलातून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना काढावी लागते वाट...

शहादा बस स्थानकाला तलावाच स्वरूप....

चिखलात पाय घसरून वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांचे दररोज होतात अपघात...

प्रवाशांनी मागणी करून देखील दुरुस्ती केली जात नसल्याने नाराजी...

शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरूपोर्णीमा उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.. साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पारंपारीक पद्धतीने साईबाबांचा फोटो, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे..

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोत्रा भणगोजी ग्रामस्थांनी काढला मोर्चा व केले दंडवत आंदोलन

चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता आझाद हिंद शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.. संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दंडवत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला... यावेळी संघटनेचे सतीशचंद्र रोठे यांनी प्रशासनाला २४ तासांची मुदत दिली असून, तोपर्यंत तोडगा न निघाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला...

मानोरा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात एक पिसाळलेला कुत्रा नागरिकांवर धावून जाऊन चावा घेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एका तासाच्या कालावधीत तब्बल १० जणांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यात दोन वयाेवृध्द, चार मूल यांचा समावेश आहे. यामध्ये नलिनीबाई वाघमारे, ज्ञानेश्वर राठोड यांना गंभीर जखमी केल आहे.

यानंतरही पिसाळलेला कुत्र्याने गावातील गल्लीबोळात शिरत अनेकांच्या अंगावर जात चावा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक पाळीव कुत्र्यांना सुद्धा चावा घेतला आहे. जखमींना मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिसाळलेल्या कुत्र्याचा हा हैदोस थांबवण्यासाठी नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे..

लांज्यात डम्पिंग ग्राऊंड विरोधात उपोषण

लांजा नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसह, शिवसेना उबाठा पक्षाकडून लांजा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं. मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह या उपोषणात सहभागी झाले होते.. डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात गेली चार वर्षे ग्रामस्थांनी नगरपंचायत, प्रांत कार्यालय यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली होती. मात्र प्रशासनाकडून मिळणाऱ्या असकार्यावर व पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. कोत्रेवाडीच्या नागरिकांना न्याय मिळत नसल्याने अखेर शिवसेना उबाठा पक्षाने नागरिकांच्या बाजूने आवाज उठविला आहे.या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून पंधरा दिवसांपूर्वी उपोषण छेडण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. त्यानुसार एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं.

सांगलीत बिबट्याच्या दहशती बरोबर आता मगरीची ही दहशत

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील धामवडे येथील वाहनधारकांना रस्त्यावर मगरीचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मगरीला प्राणी मित्राने व ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. परंतु या भागात नदी नाही तरीही मगर अली कुठून असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

वर्ध्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद

वर्धा

- जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद

- सततच्या पावसामुळे नदी, नाल्याना पूर

- आर्वी तालुक्यातील शिरपूर येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद तर सोरटा येथील नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद

- हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर अलमडोह मार्ग बंद,कोसूर्ला मोठा येथे जाण्याचा मार्ग नाल्याच्या पुरामुळे बंद तर जुना बोरगाव ते नवीन बोरगाव रस्ता सुद्धा बंद

- वर्धा तालुक्यातील सरूळ येथे यशोदा नदीला पूर आल्याने वर्धा राळेगाव मार्ग बंद

- जिल्ह्यात मागील 48 तासांपासुन सुरु आहे पाऊस

- रात्री पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे

- आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, जिल्हाधिकारी यनी शाळाना केली सुट्टी जाहीर

पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात!

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. मात्र, या रस्त्याची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठे खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असून, अपघाताचीही शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला, बफेरा पुलावरील वाहतूक बंद

बावनथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. बावनथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.सिहोरा परिसरातून गेलेल्या भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गाला बावनथडी नदीवरील पूल महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडतो. नदीवर रॉप्टर पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेकदा पूल बुडतो. तीन दिवसापासून दमदार पावसामुळे बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे.जिल्हा प्रशासना ने आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. बपेरा गावाच्या सीमेत वाहने रोखून धरण्यात आली आहे,त्या मुळे वाहनाच्या रांगाच रांगा लागलेली आहेत.

शिरपूर येथून मुंबईला गांजा घेऊन जाणा-या महिलेसह दोघे अटके

Summary

नाशिकच्या मालेगाव येथिल छावणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टेहरे चौफुली येथे सापळा रचून मारुती कार मधून शिरपूर येथून मुंबईला गांजा घेऊन जात असतांना एका महिले सह दोघांना ताब्यात घेत त्यांच्या कडून ३ लाख रुपयां पेक्षा जास्त किमतीचा ४० किलो गांजा जप्त केला आहे.हे सर्व जण मुंबई येथिल राहणारे असून त्यांच्या विरोधात आमली पदार्थ कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यात अपघात

अकोल्यातल्या पातूर - खानापूर-आगीखेड रस्त्यावर खड्यांमुळ अपघाताचे सत्र सुरूच आहे.. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले जात आहे.. पातूरातल्या तुळसाबाई कावल चौक ते खानापूर, आगीखेड, पास्टूल, कोठारी, मोरणा धरणाकडे जाणारा मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.. त्यामुळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे पाण्यामुळ दिसत नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Maharashtra Live News Update : वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

- वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे यशोदा नदीला पूर

- यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोह ते अल्लीपूर मार्ग बंद

- मार्ग बंद झाल्याने वाहतूक बंद

- अलमडोह येथे गावाच्या वेशीवर पोहचले यशोदा नदीचे पाणी

- पाणी वाढत असल्याने गावात पाणी शिरण्याचा धोका

- रात्रीपासून यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ

शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व असंतोष आहे

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी,असंतोष आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणावर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची भावना लक्षात घ्यावी कोणतीही सक्ती न करता सहमती असेल तर काहीही करा पण समंती न घेता रझाकारी कायद्या प्रमाणे प्रशासन जर जमीनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजुने खंबीरपणे उभे आहोत अस वक्तव्य धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर केलय.

पुण्यात सराईत चोरट्याकडून चोरीचे १९ मोबाईल पोलिसांनी केले जप्त

रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून विविध कंपनीचे ५ लाख रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट पोलिसांनी केले जप्त

पुणे शहरातील अनेक ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या २ आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल विलास काळे वय २३ आणि रितेश भीमराव चव्हाण वाय १८ अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे

दोन्ही आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल फोन चोरीचे अनेक गुन्हे दाखल

लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत मोबाईल फोन्स, चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी दुचाकी आणि काही रक्कम केली जप्त

साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

शिर्डीच्या साई मंदिरात आजपासून दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात आजपासून सुरूवात झाली आहे.. आज सकाळी मंगल स्नान तसेच काकड आरतीनंतर साईबाबांची पोथी, विणा आणि फोटोची मिरवणूक काढुन उत्सवाला सुरूवात करण्यात आली.. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक पार पडली.. द्वारकामाईत तीन दिवस अखंड पारायण सुरू असणार आहे.. संध्याकाळी किर्तन आणि रात्री भजनसंध्या अशा कार्यक्रमाची आज रेलचेल असणार आहे

अंबरनाथमध्ये पूर्व पश्चिम उड्डाणपुलावर खड्डे! खड्ड्यांमुळे पुलावर होतेय वाहतूक कोंडी

अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मधोमध अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर हे खड्डे पडले असून सध्या पाऊस सुरूच असल्यानं डांबराने खड्डे भरणं शक्य नाही. त्यामुळं पावसानं थोडी उघडीप घेतली, की २ ते ३ दिवसात हे खड्डे बुजवले जातील, अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे शहर अभियंता राजेश तडवी यांनी दिली आहे.

-जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल होणार?

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तहसीलदारांसह 57 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विधानपरिषेत दिले आहे. जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदाराचे लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर करून 57 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल 35 कोटींचा अपहार केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं 21 तलाठी आणि लिपिकांचं निलंबन केलं असून 36 तलाठ्यांवर विभागीय चौकशी प्रस्थापित करण्यात आली आहे. तर दोन तहसीलदारांविरोधात शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची सध्या विभागीय चौकशी सुरु आहे.विभागीय चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले आहे..

अंबरनाथ - आधी सिमेंट रस्ता बनवला, मग ड्रेनेजसाठी खोदला!

आधी कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनवला, अन मग ड्रेनेजच्या कामासाठी तो रस्ता तोडला. त्यावर लावलेला डांबराचा मुलामा काही दिवसातच उडाला, अन नागरिकांच्या नशिबी मात्र खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ आली.

ही परिस्थिती आहे अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन कडून लक्ष्मी नगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची.. अनेक वर्ष डांबराचा असलेला हा रस्ता काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रतीक्षेनंतर सिमेंटचा झाला. पण सिमेंट रस्त्याचं काम करण्यापूर्वी ड्रेनेजचं काम करावं, इतकी साधी सद्बुद्धी त्याकाळच्या अधिकारी, ठेकेदार अन नगरसेवकांना सुचली नाही. त्यामुळं काही दिवसातच हा पक्का रस्ता खोदण्यात आला. मात्र काम झाल्यावर खोदलेल्या भागावर सिमेंट ऐवजी डांबराचा मुलामा मारण्यात आला. रहदारीचा रस्ता अन उतार यावर असलेलं हे डांबर काही दिवसातच उडून गेलं, अन रस्ता मात्र उघडा पडला. या रस्त्याच्या मधोमध ओहोळ तयार झाला असून त्यात दुचाकी चालकांचे अनेकदा अपघात झाले आहेत. परंतु नगरपालिका लक्ष देत नसल्याने लक्ष्मीनगर टेकडीवरील रिक्षाचालक अनेकदा स्वखर्चाने या रस्त्यावर डबर किंवा माती आणून टाकतात. पण हे तात्पुरते उपाय टिकत नसल्यानं रस्त्याची अवस्था पुन्हा काही दिवसातच बिकट बनते. त्यामुळं अंबरनाथ पालिकेनं काहीतरी उपाय करून या रस्त्यावर डांबर नव्हे, तर थोडंसं आरएमसी टाकावं, अन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जातेय.

गुरुकुलचे विद्यार्थी रमले शेतात

रत्नागिरीतील जीजीपीएस मधील गुरुकूलच्या विद्यार्थ्यीनी शेतीच्या कामाचा अनुभव घेतला..पावसमधील शेतात भाताची रोप काढणे , चिखल करणे , भात लावणी करणे ही सर्व कामं या विद्यार्थ्यांनी केली. शेतातील ट्रँक्टर चालवत विद्यार्थ्यांनी शेतात चिखल देखील केला.शेतीची काम ही खुप कष्टाची असतात..नेमकी शेती कशी केली जाते याचं ज्ञान या विद्यार्थ्यांना देण्यात आलं.चिखल तुडवत शेतीचा मनमुराद आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला..पुस्तकांपलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी एक वेगळा अनुभव या शेतीच्या कामातून घेतला.काळाच्या ओघात आज अनेक शेती ओस पडच चाललीय मात्र गुरुकूलच्या अशा उपक्रमातून नव्या पिढीला शेतीची ओढ मात्र नक्कीच लागेल.

नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर पाणी साचल्याचा दृश्य पाहायला मिळत आहे नागपूर विमानतळाकडे जाणारा हा मार्ग असून या मार्गावर सुद्धा अशाच पद्धतीने पावसाचा पाणी जे आहे ते साचल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहे

नागपूर वर्धा मार्गावर असलेला नागपूर विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात येजा असते आणि अशा परिस्थितीमध्ये या मार्गांवर दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्यामुळे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे

शहरातील अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीने रस्त्यांवर पाणी साचल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे

जालन्यात गुन्हेगारांच्या माहितीची दर शनिवारी होणार आदान-प्रदान, जालना पोलिसांचा नवीन उपक्रम

जालन्यात अटक असलेल्या गुन्हेगारांच्या माहितीची आता देवाण घेवाण होणार आहे. जालन्याचे एसपी अजय कुमार बन्सल यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 19 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यामधील आठवडाभरात अटक केलेल्या गुन्हेगाराची दर शनिवारी व्हिसीद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना माहिती दिली जाणार आहे.वाटमारी,चोरी, घरफोडी अवैध शस्त्र बाळगणे यासह विविध गुन्ह्यातील अटक असलेल्या आरोपीची दर शनिवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला माहिती दिली जाणार आहे. जालना पोलिसांच्या या नवीन नवीन निर्णयामुळ गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात वाढ होणार असून सराईत गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.

केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासाठी जागेच्या परीपुर्ण माहितीसह प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा

धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्याच्या दृष्टीने ओमराजे आग्रही असून परीपुर्ण प्रस्ताव राज्य सरकार मार्फत केंद्राकडे पाठविण्याबाबत प्रशासनास सुचना केल्या असुन केंद्रीय विद्यालयाची गरज, संभाव्य जागेची निवड,प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तर विद्यालयाकरीता शहरातील भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा व राघुचीवाडी येथील 5 कि.मी.अंतराच्या आतील दोन्ही जागेचे प्रस्ताव पाठविणे बाबत संबंधीतांना सुचवण्यात आल्याची माहिती ओमराजे निंबाळकरांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील चार आरोपी लातूर पोलिसांच्या ताब्यात

लातूरच्या औसा रोड परिसरात मध्यरात्री एका चार चाकी वाहनातून सहा जण संशयास्पद वावरत असल्याची माहिती, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत, नांदेड मधील चार आरोपींना गावठी पिस्टलसह ताब्यात घेतल आहे.. आरोपींकडून गावठी पेस्टल पोलिसांनी जप्त केलाय. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाण्याचा प्रश्न अधिवेशनात

बोगस बियाण्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल आहे.नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाण्याचा प्रश्न अधिवेशनात देखील गाजला आहे. राष्ट्रवादीचे लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बोगस बियाण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.बोगस बियाणामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत करणार का ? बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सभागृहात उपस्थित केला.दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सभागृहात उत्तर दिले.बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करणार असून बोगस बियाणे मिळालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपूरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटून गेल्यावरही थोडी फार विश्रांती घेऊ सुरूच आहे...

त्यामुळे सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि शासकीय शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे..

सद्यस्थितीत नागपुरात 8 तारखेच्या सकाळी 8.30पासून 9 तारखेच्या सकाळी 5.30 पर्यंत 172.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे..

रविवार पर्यंत सरासरीच्या तुलनेत 40 टक्क्याची कमतरता होती.... मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग भरून काढला आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com