Siddhi Hande
भेंडीची भाजी नाव ऐकल्यावरदेखील अनेकजण नाक मुरडतात. त्यात लहान मुलांना भेंडी आजिबात आवडत नाही.
तुम्ही घरी डब्यासाठी भरली भेंडी बनवू शकतात.
भरली भेंडी बनवण्यासाठी सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवा. त्यानंतर मधोमध कापून घ्या. फक्त एका बाजूनेच भंडी कापा.
यानंतर एकीकडे शेंगदाण्याचा कूट, तीळ, लाल-तिखट, गरम मसाला, मीठ, आमचूर पावडर मिक्स करा.
त्यात तुम्ही १ चमचा तेल टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करा.
यानंतर हा मसाला कापलेल्या भेंडीमध्ये व्यवस्थित भरुन घ्या.
यानंतर कढईत थोडं तेल टाका.
त्यात ही भेंडी टाका आणि ५-१० मिनिटे मस्त शिजवून घ्या.
ही भेंडीची भाजी सर्वांनाच खूप आवडेल.